भाजपनं 66 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलीय. त्या यादीत अमराठी उमेदवारांचा दबदबा पाहायला मिळतोय. भाजपनं 66 पैकी 20 अमराठी उमेदवार दिलेत. जितेंद्र पटेल, राणी त्रिवेदी, जिग्ना शाह, शिवकुमार झा, स्वाती जैस्वाल, सिद्धार्थ शर्मा, विनोद मिश्रा, तेजिंदर सिंह तिवाना, संदीप पटेल, सुधा सिंह, ममता यादव, हेतल गाला, नील सोमय्या, चंदन शर्मा, साक्षी कनोजिया, रवी राजा आणि आकाश पुरोहित या अमराठींना भाजपनं निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे. तर भाजप मराठीचा सन्मान करत समतोल साधत असल्याचं पक्षाकडून स्पष्ट करण्यात आलंय.
advertisement
मुंबईत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने जाहीर केलेल्या यादीची वैशिष्ट्य काय?
भाजपनं अमराठी मतदारांची व्होट बँक जपण्यासाठी अमराठी उमेदवारांवर भर दिलाय. तर आता ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारी यादीची वैशिष्ट्य आहेत. फोर एम वर उद्धव ठाकरेंची भिस्त असल्याचं पाहायला मिळतंय. मुंबई, मराठी, महिला आणि मुस्लीम यावर त्यांनी भर दिलाय. 40 महिलांना ठाकरेंच्या शिवसेनेनं उमेदवारी दिलीय. मुंबईच्या रणांगणात 6 मुस्लीम उमेदवार उतरवण्यात आले आहेत. त्यातही 4 महिला उमेदवार आहेत. उमेदवारी यादीत असलेला मराठीचा ठसा आणि बहुसंख्येनं असलेल्या महिला उमेदवार यशस्वी ठरतील, असा विश्वास ठाकरेंच्या शिवसेनेला वाटतोय.
ठाकरेंचे मुस्लीम उमेदवारांना प्राधान्य
ठाकरेंची शिवसेना आणि भाजपनं त्यांची व्होट बँक जपण्यासाठी शिकस्त केल्याचं पाहायला मिळतंय. आता अमराठी मतदार भाजपची कितपत पाठराखण करतात? तर मराठी आणि मुस्लीम मतदार ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचे किती उमेदवार निवडून देतात? हे आता निकालानंतरच स्पष्ट होईल. पण लोकसभा निवडणुकीच्या निकालावर नजर टाकल्यास मुस्लिम मतदारांनी ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाजून कौल दिला होता. त्या पार्श्वभूमीवर ठाकरेंनी ही रणनीती तर अवलंबली नाही ना? अशाही राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
