TRENDING:

बीएमसीचा मास्टर प्लॅन! मुंबई-ठाणे प्रवास आता सुसाट; 1662 कोटी खर्चून उभा राहतोय 'गेमचेंजर' मार्ग

Last Updated:

Mumbai Traffic : नाहूर ते ऐरोली दरम्यान उभारण्यात येणारा नवीन प्रकल्पामुळे मुंबई-ठाणे वाहतुकीला मोठा दिलासा मिळणार आहे. या प्रकल्पामुळे सिग्नल-फ्री प्रवास शक्य होणार असून वेळ आणि इंधनाची बचत होईल.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकाने मुंबई आणि ठाणे शहरा दरम्यान वाहतूक कोंडीची समस्या कमी करण्यासाठी मोठे पाऊल उचलेले आहे. गोरेगाव-मुलुंड लिंक रोड प्रकल्पाअंतर्गत नव्या क्लोव्हरलीफ इंटरचेंच तसेच उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात झाली आहे. या प्रकल्पासाठी तब्बल 1 कोटी 662 हजार कोटी रुपयांचा खर्च येणे अपेक्षित आहे.
News18
News18
advertisement

कसा असेल हा प्रकल्प?

हा प्रकल्प झाल्या पूर्व आणि पश्चिम भाग जोडणी सुधारण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.सध्या इस्टन एक्सप्रेस हायवेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यामुळे हा प्रकल्प झाल्यावर ही कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल.

जीएमएलआर प्रकल्प चार टप्प्यांत पूर्ण केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात रस्ते रुंदीकर तर दुसऱ्या टप्प्यात पश्चिम उपनगरात उड्डाणपूल बांधण्यात येतील शिवाय संजय गांधी नॅशनल उद्यानाखाली ट्विन टनेल बांधण्यात येईल. शिवाय चौथा टप्पा हा नाहूरपासून ऐरोलीपर्यंत दोन भागांत पूर्ण केला जाणार आहे.

advertisement

मुख्य टप्प्यात नाहूर ते ऐरोली दरम्यान 1.33 किमी लांबीचा उड्डाणपूल बांधण्यात येईल. हा पूल सध्या असलेल्या ऐरोले प्लायओव्हरवरुन जाणार आहे. यामध्ये पाच पाच लेन असतील शिवाय हा केबल स्टेड ब्रिज प्रकारात बांधला जाईल.

या प्रकल्पाच चार क्लोव्हरलीफ इंडरचेंज ही तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे नाहूर, ऐरोली, ठाणे आणि मुंबई या दिशांना सिग्नल फ्री प्रवास करता येईल. प्रवाशांचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचेल आणि प्रवास सोयीस्कर होईल.

advertisement

कधी खुला होणार मार्ग?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नोकरीमधून घर खर्च भागत नव्हता, दाम्पत्याने सुरू केला चपाती आणि भाकरी व्यवसाय, महिन्याची कमाई पाहाच
सर्व पहा

या प्रकल्पाचे काम 36 महिन्यात करण्याचे उद्दिष्ट आहे तर जून 2029 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

मराठी बातम्या/मुंबई/
बीएमसीचा मास्टर प्लॅन! मुंबई-ठाणे प्रवास आता सुसाट; 1662 कोटी खर्चून उभा राहतोय 'गेमचेंजर' मार्ग
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल