TRENDING:

मुंबईत योगी पॅटर्न, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यावर हल्ला करणाऱ्यांच्या घरावर बुलडोजर

Last Updated:

Mumbai News: गोरेगावच्या दिंडोशी भागात दोन गटांतील वादानंतर मोठा गोंधळ झाला. पोलिसांनी आठ जणांना अटक केली. अनधिकृत घरांवर महापालिकेची कारवाई सुरू असून परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : गोरेगावमधील दिंडोशी परिसरात झालेल्या गोंधळानंतर प्रशासनाने तातडीने कडक पावले उचलली आहे. काल झालेल्या दोन गटांतील भांडणानंतर आज आरोपीवर थेट कारावाई करण्यात येत आहे. सध्या सुरु असलेल्या या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुंबईत राड्यानंतर बुलडोजर कारवाई
मुंबईत राड्यानंतर बुलडोजर कारवाई
advertisement

नेमकं घडलं काय?

मिळालेल्या माहितीनुसार, गोरेगाव पूर्व येथील संतोष नगर परिसरात काल संध्याकाळच्या वेळी दोन गट आमनेसाने आले. जुन्या वादातून त्यांच्यात सुरु झालेला हा वाद अचानक वाढला आणि मोठ्या हाणामाराती, गोंधळात बदलला. या प्रकरामुळे स्थानिक नागरिक प्रचंड घाबरले होते. पण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जात परिस्थिती नियंत्रणात आणली.

या प्रकरणात पोलिसांनी तब्बल आठ जणांना ताब्यात घेतले असून चौकशीनंतर त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई करणे सुरु आहे. दरम्यान ज्यांच्यावर हा सर्व राडा घडवल्याचा आरोप आहे, त्यांच्या घरांबाबतही तपास करण्यात आला आणि ती घरे अनधिकृत असल्याचे समोर आले.

advertisement

नंतर महापिलेकनेही त्यावर तत्काळ पाऊल उचलत अशा अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरु केली आहे. ज्यात संबंधितांच्या घरांवर बुलडोजर चालवण्यात येत आहे. या कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.

त्याच ठिकाणी हनुमान चालीसाचे पठण होणार

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
एका अखंड दगडात कोरलेलं मंदिर, दगडी शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना, पुण्यातील राष्ट्रकूट वंश काळातील लेणी
सर्व पहा

विशेष म्हणजे याच ठिकाणी आज संध्याकाळी एका धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून किरीट सोमय्यांच्या उपस्थितीत हनुमान चालिसाचे पठण करण्यात येार आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
मुंबईत योगी पॅटर्न, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यावर हल्ला करणाऱ्यांच्या घरावर बुलडोजर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल