TRENDING:

Mumbai Water: जोगेश्वरीकरांना मिळतंय 'काळपट' पाणी, पाण्याच्या दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

Last Updated:

गेल्या काही महिन्यांपासून जोगेश्वरी पूर्वेतील मेघवाडी परिसरातील रहिवाशांना पाण्याची समस्या उद्भवत आहे. पाईपलाईनीतून येणाऱ्या पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: गेल्या काही महिन्यांपासून जोगेश्वरी पूर्वेतील रहिवाशांना पाण्याची समस्या उद्भवत आहे. नळातून येणारं पाणी काळपट दिसत असून त्याला उग्र वास सुद्धा येत आहे. त्यामुळे नळाला येणाऱ्या रोजच्या पाण्याच्या माध्यमातून महानगर पालिकेचं पाणी विभाग नागरिकांच्या आरोग्याशी खेळतंय की काय? असा प्रश्न नागरिक विचारत आहे. जोगेश्वरी पूर्वच्या मेघवाडी परिसरातील गजानन निवास वेल्फेअर सोसायटीतल्या रहिवाशांना गेल्या अनेक दिवसांपासून काळपट आणि उग्र वास येणारं पाणी मिळत आहे. यामुळे रहिवाश्यांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
News18
News18
advertisement

जोगेश्वरी पूर्वेतील नागरिकांच्या पाण्याच्या पाईपलाईनमध्ये गटाराचं पाणी मिसळवलं जात असल्याचा संशय त्यांना आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार तिथल्या नागरिकांसोबत सुरू आहे. परिसरामध्ये दिवसा आणि रात्री असे दोन्हीही वेळ पाणी येतं. पण सकाळी येणारं पाणी तुलनेने स्वच्छ असतं. मात्र, रात्रीच्या वेळी जेव्हा पाणी सोडलं जातं, त्यावेळी पाण्याच्या पाईपलाईनचा पाण्याचा फ्लो बराच कमी होतो. त्यावेळी नागरिकांना मिळणाऱ्या पाण्यामध्ये, गटाराचं पाणी मिसळवून पाणी सोडलं जातं, असा आरोप काही नागरिकांनी केला आहे. रात्रीच्या वेळी जेव्हा पाणी येतं, तेव्हा पाणी काळपट रंगाचं दिसतं आणि त्याला उग्र वास येतो, अशी माहिती स्वत: नागरिकांनी दिली आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: कृषी मार्केटमध्ये उलटफेर, कांदा, केळीनं वाढवलं टेन्शन, लिंबू अन् द्राक्षांना किती मिळाला भाव?
सर्व पहा

मिळालेल्या माहितीनुसार, पाण्याची पाईपलाईन आणि सांडपण्याची वाहिनी एकत्र जात असल्यामुळे पाण्याच्या पाईपलाईनमध्ये सांडपाणी सुद्धा मिसळत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. परिसरातील अनेक रहिवाशांच्या अजूनही जुन्या पाईपलाईनच आहेत. जुन्या आणि गंजलेल्या पाईपलाईनमध्ये सांडपाणी जात असल्याचं बोलले जात आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या प्रकाराला तांत्रिक भाषेमध्ये सायफोनेज असं म्हटलं जातं. या प्रक्रियेमुळे कमी दाबामध्ये बाहेरील दूषित पाणी पिण्याच्या पाईपलाईनमध्ये ओढले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळेच रात्रीच्या वेळी नळावाटे स्थानिक नागरिकांना विषारी पाणी पोहोचत असल्याचा आरोप होत आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Water: जोगेश्वरीकरांना मिळतंय 'काळपट' पाणी, पाण्याच्या दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल