TRENDING:

Mumbai Metro : मुलुंडच्या दुर्घटनेनंतर मुंबई पुन्हा हादरली, घाटकोपरमध्ये मेट्रो 4 च्या बीमला मोठे तडे, काय घडलं?

Last Updated:

Mumbai Metro 4 Shocking News : घाटकोपरमध्येही मुलुंड मेट्रोची दुर्घटना होण्याची शक्यता समोर आलेली आहे. नेमकं काय घडलं आहे ते जाणून घ्या.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सुमित सांवत,प्रतिनिधा
Metro Line 4 beam cracks near R City Mall Ghatkopar
Metro Line 4 beam cracks near R City Mall Ghatkopar
advertisement

मुंबई : मुंबई शहरात अनेक मेट्रो मार्गिकेच्या कामाचे प्रकल्प सुरु आहेत हे मेट्रो प्रकल्प नागरिकांच्या सोयीसाठी जरी असले तरी त्यातून आता गंभीर घटना घडत आहेत आणि त्याही लोकांच्या जीवाशी येतं आहेत.

मुंबईकरांच्या जिवाशी खेळ सुरूच?

गेल्या काही दिवसांपूर्ण मुलुंडमध्ये मेट्रो कामादरम्यान एक अत्यंत मोठी दुर्घटना घडली होती त्यात एक जण ठार झालेला असून काहीजण गंभीर जखमी झाले होते. मात्र सध्या अशीच एक धक्कादायक घटना घडण्याच्या मार्गावर आहे आणि त्याचे सर्व फोटो आणि व्हिडिओजही समोर आलेले आहे.

advertisement

मेट्रो बीमची स्थिती पाहून स्थानिक नागरिक धास्तावले

घाटकोपरमध्ये मेट्रो लाईन 4 च्या उड्डाणपुलाच्या बीममध्ये भेगा आढळल्याची गंभीर बाब समोर आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एन विभाग कार्यालयाने ही नोंद घेतली आहे. घाटकोपर पश्चिम येथील आर-सिटी मॉलजवळ ही घटना घडली आहे. 21 फेब्रुवारी 2026 रोजी काही नागरिकांनी व्हॉट्सअ‍ॅपद्वारे तक्रार केल्यानंतर महापालिकेने तातडीने पाहणी केली.

advertisement

पाहणीदरम्यान मेट्रो लाईन 4 च्या उड्डाणपुलावरील एका बीममध्ये मोठ्या भेगा दिसून आल्या. ही बाब लक्षात घेत सहाय्यक आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ दुरुस्तीचे आदेश दिले आहेत तसेच मेट्रो लाईन 4 च्या कार्यकारी अभियंत्यांना संपूर्ण मार्गावरील सर्व संरचनांची सविस्तर तपासणी करण्यास सांगितले आहे.

महापालिकेने स्पष्ट केले आहे की, एन विभागाच्या हद्दीतील मेट्रो लाईन 4 मधील सर्व बीम, खांब आणि इतर संरचनात्मक भागांची तपासणी करून त्यांचा स्थिरतेबाबतचा अहवाल सादर करावा. हा अहवाल आयएस नियमांनुसार असणे बंधनकारक आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्याचा प्रयोग भारी, अर्ध्या एकरमध्ये केली आंतरपीक शेती, 2 लाख उत्पन्न
सर्व पहा

नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत कोणतीही जीवित किंवा आर्थिक हानी होऊ नये यासाठी त्वरित उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनी आदेशांचे पालन न केल्यास त्यांना जबाबदार धरले जाईल, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.

मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Metro : मुलुंडच्या दुर्घटनेनंतर मुंबई पुन्हा हादरली, घाटकोपरमध्ये मेट्रो 4 च्या बीमला मोठे तडे, काय घडलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल