दरम्यान शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची परवानगी मिळताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून दसरा मेळाव्याचं एक टिझर प्रसिद्ध करण्यात आलं आहे. ज्यामध्ये एक पक्ष, एक नेता, एक विचार आणि एक मैदान शिवतीर्थ असं म्हटलं आहे. तसेच या टीझरमध्ये आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे फोटो असून, आदित्य ठाकरे यांच्या हतात बाळासाहेब ठाकरे हे तलवार देतानाचा फोटो आहे.
advertisement
शिवाजी पार्कवर यंदा कोणाचा दसरा मोळावा होणार? उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. दोन्ही गटाकडून दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर दावा करण्यात आला होता. दोन्ही पक्षाकडून परवानगीसाठी महापालिकेला पत्र देण्यात आलं होतं. मात्र आता शिवसेनेकडून आपलं पत्र मागे घेण्यात आल्यानं महापालिकेनं शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी ठाकरे गटाला परवानगी दिली आहे. परवानगी मिळताच ठाकरे गटाकडून मेळाव्याचं टीझर प्रसिद्ध करण्यात आलं आहे.