TRENDING:

डोळा फुटला तरी उपचार मिळेना, मेमोसाठी RPF ने तासभर बसवून ठेवलं, रेल्वेचा संवेदनशीलतेचा बुरखा फाटका, हादरवणारा प्रसंग

Last Updated:

जखमी झालेल्या निशांत खत्रीला पोलिस अधिकाऱ्यांनी तब्बल स्टेशनला बसवून ठेवल्याचा दावा जखमी तरुणाने केला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
संकेत वरक, प्रतिनिघी
News18
News18
advertisement

मुंबई : मालाड रेल्वे स्थानकात एका प्राध्यापकाची निर्घृण हत्या झाल्याची घटना ताजी असतानाच, पश्चिम रेल्वे मार्गावर आणखी एक गंभीर प्रकार समोर आला आहे. रेल्वे प्रवासादरम्यान दोन प्रवाशांमध्ये झालेल्या भांडणात तिसऱ्याच तरुणाला आपला एक डोळा गमवावा लागला. या घटनेमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मात्र या प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली असून वांद्रे लोहमार्ग पोलिसांचा भोंगळ कारभार समोर आला आहे. जखमी झालेल्या निशांत खत्रीला पोलिस अधिकाऱ्यांनी तब्बल स्टेशनला बसवून ठेवल्याचा दावा जखमी तरुणाने केला आहे.

advertisement

वांद्रे रेल्वे स्थानाकात एक धक्कादायक प्रकार समोर आला. दोन प्रवाशांच्या भांडणात तिसऱ्याच व्यक्तीला आपला डोळा कायमचा गमवावा लागला आहे.दोन व्यक्तींच्या भांडणानंतर त्यातील एक जण रेल्वेतून खाली उतरला आणि ट्रेनच्या दिशेने दगडी फेकू लागला. त्यातील एक दगड निशांत खत्रीच्या डोळ्याला लागून तो गंभीर जखमी झाला. त्याच्यावर सध्या हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरु असून एक डोळा मात्र त्याने कायमचा गमावला आहे.

advertisement

निशांत खत्री काय म्हणाला?

निशात खत्री म्हणाला, मी कामाहून सुटल्यानंतर १० वाजता साकीनाकापर्यंत मेट्रोने प्रवास केला. त्यानंतर अंधेरी स्टेशनला गेलो तिथून 10.40 ला सुटणारी चर्चगेट फास्ट पकडून मी निघालो .वांद्रे स्थानकावर ट्रेन आली असताना एकजण ट्रेनमधून उतरला आणि त्याने खालून थेट दगड मारला. तो माझ्या डोळ्याला लागला ट्रेनमध्ये अनेक लोक होते पण कोणीच मदत केली नाही. मलाही आधार दिला नाही, त्या माणसालाही पकडलं नाही. मी धावत्या ट्रेनमधून खाली उतरलो, मात्र कोणीही चेन ओढण्याचाही प्रयत्न केला नाही. त्यानंतर आरपीएफला भेटलो त्यांनी मला जखमी अवस्थेत संपूर्ण प्लॅटफॉर्मवर चालवलं

advertisement

आम्ही स्टेशन मास्तरांच्या ऑफिसमध्ये गेलो. त्या ठिकाणी मला तासभर तरी थांबवण्यात आलं मी भीक मागत होतो की मला रुग्णालयात घेऊन जा पण आरपीवाल्यांचं म्हणणं असं होतं जोपर्यंत स्टेशन मास्तर येणार नाही आणि मेमो बनणार नाही तोपर्यंत आम्ही काहीच करू शकत नाही . ज्यावेळी माझे भाऊ आले स्टेशनवर त्यावेळी त्या माझ्या भावांनी मला ॲम्बुलन्समध्ये बसवलं आणि रुग्णालयात नेलं त्यावेळी पोलिसवाले म्हटले की कुठल्याही सरकारी रुग्णालयात घेऊन जावं लागेल

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पारंपरिक ते ट्रेंडी वस्तू, ठाण्यात स्वस्तात करा खरेदी, इथं भरलंय खास प्रदर्शन
सर्व पहा

बाबा हॉस्पिटलमध्ये डॉक्टर नव्हते तिथे असलेल्या वॉर्ड बॉयने माझी ड्रेसिंग केली. जखम साफ केली आणि इंजेक्शन दिलं आणि तिथे सांगण्यात आलं की, इथे काही उपचार होणार नाही तुम्ही यांना दुसऱ्या खाजगी रुग्णालयात घेऊन जावा आमच्याकडे डॉक्टर नाही आहे आणि त्यांनी हात वर केले . मग माझ्या भावांनी मला इथे हिंदुजा मध्ये आणलं. आता या ठिकाणी माझी सर्जरी करण्यात आला आहे माझा संपूर्ण डोळ्यातील आयबॉल हा पूर्णपणे उघडला गेला आहे. संपूर्ण डोळा आतमधून टाके मारून ठेवला आहे माझं कोणाचंही भांडण नव्हतं मी माझ्या घराकडे निघालो होतो . डॉक्टरांचे म्हणणं आहे की माझा एक डोळा हा कायमचा गेला आहे.

मराठी बातम्या/मुंबई/
डोळा फुटला तरी उपचार मिळेना, मेमोसाठी RPF ने तासभर बसवून ठेवलं, रेल्वेचा संवेदनशीलतेचा बुरखा फाटका, हादरवणारा प्रसंग
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल