कसे आले प्रकरण उघडकीस?
गुन्हे शाखेचे प्रभारी निरीक्षक भारणे घोणे यांना शिवाजी नगर परिसरात काही दवाखाने आहेत, तिथं बोगस डॉक्टर कार्यरत असल्याची माहिती मिळाली होती. मग याच माहितीच्या आधारे त्यांनी पालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसह ही कारवाई केली आहे.
तपासादरम्यान आरोपींकडे कोणतेही वैद्यकीय परवाने किंवा वैद्यकीय परिषदेची नोंदणी तसेच महापालिकेची अधिकृत परवानगी नसल्याचे स्पष्ट झाले. तरी देखील ते रुग्णांवर उपचार करत होते. या कारवाईत पोलिसांनी त्यांच्या दवाख्यांतून विविध औषधे आणि उपचारासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त केले आहे.
advertisement
समोर आलेल्या या प्रकारामुळे परिसरातील असलेल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरु असून अशा बोगस डॉक्टरवर लवकरात लवकर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
