शिवाजी पार्कात 'मालीश गँग'चा पर्दाफाश
मिळालेल्या माहितीनुसार ही चोरट्यांची टोळी अशा घरांची निवड करत असे जिथे फक्त ज्येष्ट व्यक्ती एकटे राहतात. आरोपी आधी ज्येष्ठ नागरिकांचा विश्वास संपादर करत असे आणि त्यांना मालिश करण्याचा प्रस्ताव देत घरात प्रवेश करत. त्यानंतर योग्य ती संधी साधून घरातील वृद्धांना बांधून ठेवत घरातील महागड्या वस्तू चोरत असतं.
advertisement
असाच प्रकार एका 62 वर्षीय एका वृ्द्ध व्यक्तीसोबत घडला. त्यानंतर शिवाजी पार्क पोलिसांनी तातडीने तपासाचा वेग वाढवला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेच आणि अन्य माहितीच्या आधारे पोलिसांनी या टोळीचा माग काढत त्यांनी अटक केली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींध्ये एक रणविर सिंग(वय19) तर विवेककुमार शिवदंतबनारी कुमार ठाकूर (वय19) आणि एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे.प्राथमिक तपासात तर या आरोपींनी अशाच प्रकारे अजून काही गुन्हे केले असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
