TRENDING:

Elphinstone Bridge: 113 वर्षे जुना एल्फिस्टन पूल आता होणार इतिहासजमा, आज रात्रीपासून सुरू होणार पूल पाडायला सुरूवात

Last Updated:

113 वर्षे जुना परळचा एल्फिन्स्टन पुलाचा शेवटचा टप्पा पाडण्याचे काम शुक्रवारच्या मध्यरात्रीपासून जलद पद्धतीने सुरू केले जाणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: 113 वर्षे जुन्या एल्फिन्स्टन पुलाचा शेवटचा टप्पा पाडण्याचे काम शुक्रवारच्या मध्यरात्रीपासून जलद पद्धतीने सुरू केले जाणार आहे. मध्य रेल्वेच्या परिसरामध्ये असलेल्या पुलाचा उरलेला भाग आठवड्याभरात पाडला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. म्हणूनच, रेल्वेकडून चार तासांचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. मुंबईतील मोठ्या पायाभूत प्रकल्पासाठी या पुलाकडे पाहिले जातेय. त्या दृष्टीने आता कामाला सुरूवात झालेली आहे.
News18
News18
advertisement

एल्फिस्टन पुलाच्या जागी 4.5 किलोमीटर लांबीचा वरळी- शिवडी उन्नत मार्गाचे बांधकाम केले जाणार आहे. ह्या डबलडेकर ब्रिजचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) च्या माध्यमातून राबवले जात आहे. तर रेल्वेच्या परिसरामध्ये काम, महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (MRIDC) कडून केले जाणार आहे. त्यामुळे या विशेष कामासाठी गेल्या काही दिवसांपासून सतत मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेतला जात आहे. त्यानंतर या येत्या विकेंडला सुद्धा पुलाच्या कामासाठी मेगाब्लॉक हाती घेण्यात आला आहे.

advertisement

दरम्यान, सतत आठवडाभर रात्री 11.45 ते पहाटे 3.45 वाजेपर्यंत चार तासांचा मेगाब्लॉक घेतला जात आहे. मध्य रेल्वेच्या हद्दीमध्ये पुलाचा लोखंडी सांगाडा हटवण्यासाठी आठवडाभर तब्बल 26 तासांचा मेगाब्लॉक हाती घेण्यात आल्याची माहिती आहे. मुंबईची लोकसंख्या पाहता पुल वाहनांसाठी कमी पडत होता. पुलाची रूंदी आणि उंचीमुळे बऱ्याचदा रेल्वेला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. आता त्याच पुलावर वरळी- शिवडी एलिव्हेटेड कॉरिडॉर उभारला जाणार आहे. त्याच्यासाठीच नवीन संरचना उभारली जात आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कृषी मार्केटमध्ये मोठी उलथापालथ, केळी आणि कांद्याला कवडीमोल भाव, लिंबाची काय स्थिती?
सर्व पहा

दरम्यान, परेल आणि प्रभादेवी या दोन परिसरांना जोडणारा एल्फिस्टन ब्रिज हा आहे. या पुलामुळे प्रवाशांना अगदी पूर्वेवरून पश्चिमेसाठी जाणं फार सोप्प होतं. परंतु सध्या काम सुरू असल्यामुळे मुंबईकरांना अनेक पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत आहे. दरम्यान, वरळी- शिवडी एलिव्हेटेड कॉरिडॉरमुळे प्रभादेवी आणि परळमधील रहिवाशांना वाहतुकीसाठी फारच सोयीस्कर होणार आहे. दरम्यान, 1913 साली इंडियन पेनिन्सुला रेल्वेने बांधलेल्या पुलाला मद्रास प्रेसीडेंसीचे गव्हर्नर लॉर्ड एल्फिन्स्टन यांचे नाव देण्यात आले. तब्बल 113 वर्षानंतर या पुलाची पुन:र्बांधणी केली जात आहे. 12 सप्टेंबर 2025 पासून या पुलावरून वाहतुक बंद करण्यात आली असून तेव्हापासून पाडकाम सुरू आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Elphinstone Bridge: 113 वर्षे जुना एल्फिस्टन पूल आता होणार इतिहासजमा, आज रात्रीपासून सुरू होणार पूल पाडायला सुरूवात
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल