मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील पश्चिम उपनगरातील विलेपार्ले परिसरात सकाळी ही घटना घडली. या भागात असलेल्या सुविधा पर्ल नावाच्या 13 मजली इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यावर आग लागली होती. बांधकाम व्यावसायिक जीतू सत्रा यांचा हा इमारतीत फ्लॅट असल्याचं समोर आलं आहे.
१३ व्या मजल्यावर अचानक आग लागली होती. या आगीत जीतू सत्रा यांच्या भावाच्या पत्नी गंभीर जखमी झाली होती. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं होतं. पण, संध्याकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे.
advertisement
तर जीतू सत्रा यांची मुलगी अनेरी ही सुद्धा आगीत गंभीर जखमी झाली आहे. सध्या अनेरीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, जितू सत्रा यांचा मुलाचं उद्या मंगळवारी लग्न होतं. त्यामुळे सर्व नातेवाईक त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते. लग्नाच्या आदल्या दिवशीच वर आईचा मृत्यू झाला आहे. लग्नघरात उद्भवलेल्या या प्रसंगामुळे सध्या परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, आगीची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. पाच अग्निशमन दलाच्या गाड्यांनी आग आटोक्यात आणली होती. या इमारतीला आग कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलं नाही. मात्र, लग्न घरात घडलेल्या घटनेमुले सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे
