राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर इंदापुरचे आमदार दत्तात्रेय भरणे यांनी महायुतीत राहून अजित पवार यांना साथ देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तिकिटासाठी भाजपत प्रवेश केलेले हर्षवर्धन पाटील यांची चांगलीच कोंडी झाली. परंतु मधल्या काळात देवेंद्र फडणवीस यांना वरचेवर भेटून मार्ग काढण्याची विनंती पाटील यांनी केली. मात्र 'ज्याचा आमदार त्याची जागा' हे महायुतीचे सूत्र ठरल्याने इंदापूरची जागा अजित पवार यांच्या नेतृत्वालाच जाईल, हे स्पष्ट झाल्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी आशा सोडून पुढची तयारी सुरू केली आहे.
advertisement
नारीशक्ताच नाकारण्याची संभाजी भिडेंना अवदसा, दौडीत सहभागाला नो एन्ट्री!
त्याचाच भाग म्हणून हर्षवर्धन पाटील यांनी इंदापुरातील कार्यकर्त्यांची बैठक घेऊन हितगूज केले. काहीही करून आपल्याला निवडणूक लढायची. भले हातात तुतारी घ्या, तुतारी नाही मिळाली तर अपक्ष म्हणून निवडणुकीला सामोरे जा, असा कौल कार्यकर्त्यांनी दिला. हर्षवर्धन पाटील यांनी तुतारी हातात घेऊन दत्तात्रेय भरणे यांच्याशी दोन हात करावेत, यासाठी कार्यकर्त्यांचा दबाव वाढत होता. इकडे हर्षवर्धन पाटील यांनीही पवारांशी संपर्क करणे सुरू केले होते. मध्यंतरी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीत हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूरसंबंधी आपले म्हणणे शरद पवारांच्या कानावर टाकले होते. त्याच बैठकीत उभय नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली.
अखेर आचारसंहिता लागायला काहीच दिवस शिल्लक असताना आणि पितृपक्ष संपताच हर्षवर्धन पाटील यांनी मुंबईत पवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. प्रवेशासंदर्भात आणि पुढील राजकीय समीकरणांवर दोघांमध्ये चर्चा झाली. हर्षवर्धन पाटील शुक्रवारी इंदापुरात पत्रकार परिषद घेऊन प्रवेशाचा अंतिम निर्णय जाहीर करणार आहेत, अशी प्राथमिक माहिती कळते आहे.