ठाकरे गटाकडून एकूण 34 याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. त्यांची एकत्रित सुनावणी घेण्यात यावी अशी मागणी युक्तीवादादरम्यान ठाकरे गटाच्या वकिलांकडून करण्यात आली आहे. मात्र दुसरीकडे शिवसेनेच्या वकिलांनी या मागणीला विरोध केला आहे. याचिकांवर वेगवेगळी सुनावणी घेतल्यास वेळ लागले, त्यामुळे सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी व्हावी अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.
advertisement
मात्र दुसरीकडे शिवसेनेच्या वकिलांनी याला विरोध केला आहे. प्रत्येक याचिकेची कारणं वेगळी आहेत, त्यामुळे प्रत्येक याचिकेवर स्वतंत्र सुनावणी घ्या अशी मागणी शिवसेनेनं केली आहे. प्रत्येक याचिकेतील मुद्दे वेगळे असताना याचिका एकत्र करण्यासंदर्भातील मागणीवर निकाल कसा देता येईल? असा युक्तिवाद शिवसेनेच्या वकिलांनी केला आहे. यावर आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय निर्णय घेणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.