हसमुखभाई शाह यांच्या मुलाने 30 मार्च रोजी, जुहू पोलीस स्थानकामध्ये घटनेची तक्रार नोंदवली. या घटनेनंतर टु व्हिलर चालक फरार झाला. त्यामुळे त्यांनी ही तक्रार अज्ञात व्यक्तीच्या नावे दाखल केली आहे. विलेपार्ले पश्चिमेतील स्वास्तिक सोसायटीमध्ये शाह कुटुंब वास्तव्याला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 मार्चच्या संध्याकाळी हसमुखभाई त्यांच्या सोसायटीच्या खाली औषधे खरेदी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी एका अज्ञात भरधाव वेगाने येणाऱ्या टु व्हिलर ड्रायव्हरने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेमध्ये हसमुखभाई यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
advertisement
घटनेनंतर त्या अज्ञात ड्रायव्हरने घटनास्थळावरून पळ काढला. हसमुखभाई यांच्यावर जवळच्या एका खासगी रूग्णालयामध्ये उपचार सुरू होते. परंतु उपचारादरम्यान त्यांचे 26 मार्च रोजी मृत्यू झाला. या घटनेनंतर पुन्हा एकदा भरधाव वेगाने वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये 'हिट अँड रन'चे प्रकरण घडत आहे. या घटनेमुळे अनेक निष्पाप पादचाऱ्यांचा जीव जात आहे. दरम्यान, पोलिसांकडून या घटनेची चौकशी केली जात असून सध्या पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.
