TRENDING:

Samruddhi Mahamarg : प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! समृद्धी महामार्गावर तब्बल 9 दिवसांचा ब्लॉक; कधी आणि कुठे?

Last Updated:

Samruddhi Expressway Update : समृद्धी महामार्गावर 9 ते 18 फेब्रुवारीदरम्यान टप्प्याटप्प्याने वाहतूक बंद राहणार आहे. पण वाहनचालकांनी कोणते पर्यायी मार्ग वापरावे ते जाणून घेऊयात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : राज्यातील महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर पुढील काही दिवस वाहतूक बंद राहणार आहे. या मागील नेमके कारण काय आणि नेमका किती दिवस हा महामार्ग बंद असणार आहे ते जाणून घेऊयात.
Samruddhi Expressway traffic block February 2026
Samruddhi Expressway traffic block February 2026
advertisement

महामार्ग बंद असण्याचे कारण काय?

समृ्द्धी महामार्गावरील गॅन्ट्री उभारण्याचे काम हाती घेण्यात आले असून यासाठी 9 ते 18 फेब्रुवारी या कालावधीत एकूण 21 टप्प्यांत वाहतूक ब्लॉक घेतला जाणार आहे.

कोणत्या ठिकाणी सुरु करण्यात येणार हे काम?

हे काम एमएसआरडीसी यांच्यामार्फत करण्यात येणार आहे. नागपूरपासून किमी 300 ते किमी 365 या दरम्यान म्हणजेच बुलढाणा जिल्ह्यातील लोणार, सिंदखेडराजा, देऊळगावराजा तसेच जालना तालुक्यात गॅन्ट्री उभारण्यात येणार आहेत.

advertisement

प्रत्येक टप्प्यात 45 ते 60 मिनिटे वाहतूक पूर्णपणे बंद

प्रत्येक टप्प्यात महामार्गावरील संबंधित वाहिनीवरील वाहतूक 45 ते 60 मिनिटांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. या कालावधीत प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू शकतो.

समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी या कालावधीत प्रवास करताना विशेष काळजी घ्यावी असे आवाहन एमएसआरडीसी आणि वाहतूक प्रशासनाकडून करण्यात आले आहे. गरज भासल्यास पर्यायी मार्गांचा वापर करावा, वेळेचे योग्य नियोजन करावे आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे असेही सांगण्यात आले आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मानव संस्कृतीचे दुर्मिळ पुरावे, डेक्कन कॉलेजच्या पुरातत्त्व विभागात अनोखा ठेवा
सर्व पहा

समृद्धी महामार्गामुळे नागपूर, वर्धा, अमरावती, वाशीम, बुलढाणा, जालना, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, नाशिक आणि ठाणे असे 10 जिल्हे थेट जोडले गेले असून हा महामार्ग राज्यातील महत्त्वाचा दळणवळणाचा दुवा ठरला आहे.

मराठी बातम्या/मुंबई/
Samruddhi Mahamarg : प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! समृद्धी महामार्गावर तब्बल 9 दिवसांचा ब्लॉक; कधी आणि कुठे?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल