संशयापायी सुखी संसाराचा खेळखंडोबा
भिवंडी तालुक्यातील टेंभीवली गावात राहत असलेल्या पतीने फक्त पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत संतापाच्या भरात तिची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली.ही घटना परिसरात समजताच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, टेंभीवली गावातील एका वीटभट्टीवर हे दाम्पत्य अर्थात सुरेश वाघे आणि त्याची पत्नी इंदिरा वाघे हे दोघेही मजूरीचे काम करत असत. गेल्या काही दिवसांपासून सुरेश हा पत्नीवर संशय घेत होता. त्यावरुन दोघांमध्ये वाद होऊन तो इतर व्यक्तीसोबत संबंध असल्याचा आरोप करत असत.
advertisement
शनिवार ठरला दुर्दैवी
मात्र शनिवारचा दुर्देवी दिवस सुरु झाला. त्याच दिवशी दोघांमध्ये पुन्हा एकदा याच कारणावरुन वाद झाला. त्यात त्या दिवशी सुरेशने मद्यपान केले होते. दोघांमधीव वाद इतका वाढत वाढत टोकाला गेला की सुरेशने संतापाच्या भरात जवळच असलेल्या अवजड वस्तूने इंदिराच्या डोक्यात जोरात वार केला. मात्र गंभीर जखमी झालेल्या इंदिराचा जागीच मृत्यू झाला.
ही घटना वीटभट्टीवर झाल्याने तेथील इतर कामगार पूर्णपणे घाबरुन गेले आणि त्यांनी सरळ पळून जाण्याआधी सुरेशला पकडून ठेवले. काही कामगारांनी ही माहिती पोलिसांनी दिली. घटनेची दखल घेत पोलिसही तातडीने घटनास्थळी पोहोचेल. पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन सुरेशला अटक केली.
या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊन मोठी खळबळ ही उडाली होती. पण कौटुंबिक वाद आणि संशय घेतल्याने हा प्रकार इतक्या टोकाला जाऊन शकतो यांमुळे चिंता व्यक्त केली जात आहे शिवाय या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून केला जात आहे.
