TRENDING:

Shocking : मोबाईल पाहिला म्हणून पतीच हैवानी कृत्य; घरात पत्नी अन् मुलासोबत...; मुंबईतील संतापजनक घटना

Last Updated:

Mumbai Shocking Crime : अनेकदा घरगुती वाद गंभीर गुन्हा घडवण्यास भाग पाडतात. मुंबईतून ही आता असे एक प्रकरण समोर आले आहे. ज्यात पतीने घराच्यांसोबत धक्कादायक कृत्य केलेले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
Choose
News18 on Google
advertisement
मुंबई : हसत्या खेळत्या कुटुंबार अनेकदा दु:खाचा डोंगर कोसळतो आणि सर्व एकाच क्षणी संपतं आणि ज्या घटनेच्या झळा आयुष्यभरासाठी घरातील काही व्यक्तींना सोसाव्या लागतात. हे असं का म्हणतोय कारण, मुंबई शहरातून एक असंच धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे.
News18
News18
advertisement

नेमकं कुटुंबियासोबत घडलं काय?

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील अंधेरी परिसरात घरगुती वादातून पतीने पत्नी आणि मुलावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे.

मोबाइल पाहण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून हा प्रकार समोर आला. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ज्यात रविवारी रात्री साधारण साडेनऊच्या सुमारास अंधेरी एमआयडीसी भागात ही घटना घडली. निता रावते (वय 48) या पती संतोष रावते (वय44) आणि दोन मुलांसह एका सोसायटीत राहतात. निता नोकरी करत असून संतोष सध्या बेरोजगार असल्याचे समजते. गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये छोट्या कारणांवरून वाद सुरू होते.

advertisement

रविवारी रात्री निता या घरी मोबाइल पाहत होत्या. यावरून संतोषने त्यांच्याशी वाद घातला. वाद वाढत गेला आणि रागाच्या भरात संतोषने कोयत्याने निता यांच्यावर वार केले. त्यात त्यांच्या हातांना, बोटांना आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली. मध्ये पडलेल्या सात वर्षांच्या मुलालाही मारहाण झाली असून त्याच्या हाताला दुखापत झाली आहे.

शेजारी धावून आले म्हणून पुढचा अनर्थ टळला

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
तुमचा जीव मोलाचा! पुण्यातली संस्था करतेय कौतुकास्पद काम, Video पाहून कराल सलाम
सर्व पहा

निता यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारी मदतीला धावून आले आणि त्यांनी पोलिसांना कळवले. एमआयडीसी पोलीस ठाणे येथील पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून संतोष रावतेला अटक केली. त्याच्यावर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पुढील तपास सुरू आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Shocking : मोबाईल पाहिला म्हणून पतीच हैवानी कृत्य; घरात पत्नी अन् मुलासोबत...; मुंबईतील संतापजनक घटना
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल