मुंबई: राज्याच्या गाडा हाकला जाणाऱ्या मंत्रालयामध्ये एका क्लर्कने लाच स्वीकारण्यात आल्याच्या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री नरहरी झिरवळ यांच्या अंतर्गत विभागात हा प्रकार घडला. या क्लर्कने ३५ हजारांची लाच स्वीकारली होती, पण आता या लाचेच्या व्यतिरिक्त आणखी पैसे या लाचखोराकडे सापडले असल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement
राष्ट्रवादीचे नेते आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या विभागात मंत्रालयामध्ये क्लर्क राजेंद्र ढेरंगे याला लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ लाच घेताना पकडलं आहे. आरोपी राजेंद्र ढेरंगेला आज कोर्टात हजर करण्यात आलं होतं. राजेंद्र ढेरंगेची जेव्हा झाडाझडती घेतली असता एसीबीला आणखी 42 हजार रुपये मिळाले होते. आरोपी ढेरंगेनं 35 हजारांची लाच घेतली होती. मात्र छापा झाल्यानंतर त्याच्याकडे आणखी 42 हजार रुपये रोकड सापडली आहे.
एखाद्या व्यक्तीला मंत्रालयाच्या गेटमधून आतमध्ये फक्त 10 हजारच रोकड आतमध्ये नेण्याची परवानगी आहे मात्र, या प्रकरणातले तक्रारदार स्वतःच सगळे पैसे घेऊन गेल्याने त्याचीही चौकशी होणार आहे. लाचेची 35 हजार आणि आणखी काही रक्कम तक्रारदार घेऊन गेले होते. आरोपी राजेंद्र ढेरंगे याचे सीडीआर आणि इतर तांत्रिक बाबीही पडताळल्या जाणार आहेत.
लाच घेतलेले 35 हजार सोडून आणखी 42 हजारांची रोकड सापडल्याने एसीबीकडून त्याची चौकशी केली जाणार आहे. आरोपीकडे सापडलेले 42 हजार रुपये कोणाचे आहेत की आणखी कुठल्या व्यक्तीकडून लाच घेतली होती हे आता तपासले जाणार आहे.
लाचखोर लिपिकाला 16 फेब्रुवारीपर्यंत कोठडी
दरम्यान, मेडिकल परवाना रद्द करण्याच्या प्रकरणी राजेंद्र ढेरंगे याने ३५ हजारांची लाच स्वीकारली होती. ढेरंगेला अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केलं होतं. एसीबीची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) काल राजेंद्र ढिंगरेलाा ३५ हजारांची लाच घेतल्याच्या आरोपावरून अटक केली. लाच स्वीकारल्याचा आरोप सरकारी काम करून देण्यासाठी संबंधित रक्कम स्वीकारल्याचं आरोप असून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. एसीबी कोठडीची मागणी सरकारी वकिलांनी मालमत्ता तपासणी, वरिष्ठ अधिकाऱ्यांचा संबंध आहे का, याची चौकशी आणि आवाज नमुना तपासणीसाठी एसीबी कोठडीची मागणी न्यायालयात केली. वरिष्ठांशी संबंध तपासणार या प्रकरणात आणखी कुणाचा सहभाग आहे का, याची सखोल चौकशी करण्याची गरज असल्याचे सरकारी बाजूने नमूद करण्यात आलं.
तर आरोपीचे वकील अॅड. डी. एस. जांबुलीकर यांनी रक्कम जमा करण्यात आली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संबंध हा वैयक्तिक भाग असल्याचं सांगितलं. व्हॉईस सॅम्पलसाठी कोठडी नको आवाज नमुना तपासणीसाठी कधीही हजर राहू शकतो, त्यासाठी पोलीस कोठडीची आवश्यकता नसल्याचा बचाव केला. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आरोपीला १६ फेब्रुवारी पर्यंत एसीबी कोठडी सुनावली आहे.
