मेट्रोच्या स्लॅब कोसळल्याच्या प्रकरणामध्ये एकूण पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिलन रोड बिल्डटेक या रिलायन्स अस्तालदी कंपनीच्या कॉन्ट्रेक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणात प्रोजेक्ट डायरेक्टर हरीश चौहान, प्रोजेक्ट मॅनेजर कुलदीप सपकाळ, डेप्ट्युटी मॅनेजर सौरभ सिंह, सुपरवायर प्रशांत भोईर आणि अवधूत इनामदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी कलम 105, 110, 324(5) आणि 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. सध्या या प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्यात येत आहे.
advertisement
मेट्रोच्या अपघातग्रस्त खांबाचे संरक्षणात्मक परिक्षण केले जाणार आहे. अतिरिक्त महानगर आयुक्त आश्विन मुदगल यांनी घटनास्थळाची प्रत्यक्षात जाऊन पाहणी केली आहे. कंत्राटदार मिलान इन्फ्रा यांच्यावर 5 कोटींचा दंड तर, सल्लागाराला एक कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे. सध्या संपूर्ण प्रकरणाची यंत्रणेकडून चौकशी केली जात आहे. एमएमआरडीएकडून मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना 15 लाखांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. आता चौकशी अंती काय माहिती समोर येणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
