TRENDING:

Mumbai Flyover : प्रतीक्षा संपली! मुंबईतील 130 वर्षे जुना पूल आजपासून खुला; पण आता 'या' नावाने ओळखला जाणार

Last Updated:

Mumbai Bellasis Flyover : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. शहरातील एक महत्त्वाचा आणि अतिशय जुना एक पुल आजपासून वाहतूकासाठी खुला होणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
Choose
News18 on Google
advertisement
मुंबई : मुंबई शहरात अनेक ब्रिटीश कालीन पूल आहेत. जिथे अनेक पूलाच्या पुनर्बांधणीचे काम सुरु घेण्यात आलेले आहे. आता त्यातील एका 130 वर्षे जुना आणि शहरातील मुख्य भागांना जोडणारा पुल आज वाहतूकीसाठी खुला होणार आहे. मात्र पुल जरी खुला करण्यात आला तरी मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे.
Bellasis Flyover renamed after Ahilyabai Holkar in Mumbai
Bellasis Flyover renamed after Ahilyabai Holkar in Mumbai
advertisement

वाहतूक कोंडीतून मुंबईकरांसाची सुटका

मुंबईतील ताडदेव, नागपाडा आणि मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या बेलासिस उड्डाणपुलाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. मात्र यात ते व्हिडिओ कॉलव्दारे असणार असून या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार आणि महापौर रितू तावडे उपस्थित राहणार आहेत.

बेलासिस उड्डाणपुलाचे नवे नाव काय?

महत्त्वाचे म्हणजे यापूर्वी हा पुल बेलासिस या नावाने ओळखला जात होता. मात्र आता या पुलाला 'पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर उड्डाणपूल' असे नाव देण्यात येणार आहे. यापूर्वी या पुलाचे नाव मेजर जनरल जॉन बेलासिस यांच्या नावावर ठेवण्यात आले होते. या पूलाच्या नाव बदलण्याची मागणी आणि हे नवीन नाव ठेवण्याची मागणी पालकमंत्री लोढा यांनी केली होती. त्यानुसार आता नावबदलाचा निर्णय घेण्यात आला आहे.

advertisement

ठरलेल्या वेळेपेक्षा चार महिने आधीच काम पूर्ण

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
रमजानमध्ये दिली जाते जकात, काय आहे या मागील प्रथा आणि महत्त्व? Video
सर्व पहा

साधारण 130 वर्षे जुना असलेला हा उड्डाणपूल धोकादायक घोषित करण्यात आला होता. त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने त्याच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेतले. याआधी काही पुलांची कामे रखडल्यामुळे पालिकेवर टीका झाली होती. मात्र, बेलासिस पुलाचे काम ठरलेल्या वेळेपेक्षा तब्बल चार महिने आधी पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे हा प्रकल्प वेळेत पूर्ण झाल्याने प्रशासनाचे कौतुक होत आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Flyover : प्रतीक्षा संपली! मुंबईतील 130 वर्षे जुना पूल आजपासून खुला; पण आता 'या' नावाने ओळखला जाणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल