TRENDING:

Mumbai- Nashik Trains: अचानक नाशिकला जायचंय? टेन्शन नको! सकाळच्या रेल्वेचं अपडेटेड वेळापत्रक

Last Updated:

जर तुमचे रात्री अचानक नाशिकला जाण्याचा प्लॅन झाला आहे आणि सकाळी कोणकोणत्या ट्रेन्स असतील? याची तुम्हाला नसेल तर घाबरू नका, आम्ही तुम्हाला सकाळच्या ट्रेन्सचं अपडेटेड टाइमटेबल देत आहोत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई ते नाशिक प्रवास करणाऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. मुंबई ते नाशिक हा प्रवास रेल्वेने साडे तीन तासांचा आहे. हा साडे तीन तासांचा प्रवास एक्सप्रेस किंवा सुपरफास्ट एक्सप्रेसने करतो. जर अचानक तुमचं आदल्या रात्री नाशिकला जायचं ठरलं आहे. पण कदाचित तुम्हाला नाशिकला जाण्यासाठी कोणकोणत्या ट्रेन्स असतात, हे माहिती नसेल. तर काळजी घेऊ नका. आम्ही तुम्हाला दररोज सकाळी मुंबई ते नाशिक कोणकोणत्या ट्रेन्स असतील, याबद्दलची माहिती या बातमीमध्ये देतो.
Mumbai CSMT To Nashik Road Train Timetable Check Here How Long Will Tt Take Time
Mumbai CSMT To Nashik Road Train Timetable Check Here How Long Will Tt Take Time
advertisement

मुंबई सीएसएमटी ते नाशिक रोड हा प्रवास साडेतीन तासांचा असून 188 किलोमीटरचा हा प्रवास असणार आहे. तर तुम्हाला मुंबई सीएसएमटी हून सकाळी 5.30 वाजता तपोवन एक्सप्रेस, मुंबई सीएसएमटी हून सकाळी 6 वाजता 12859 गीतांजली सुपरफास्ट एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस हून सकाळी 6 वाजता 22183 साकेत एक्सप्रेस, मुंबई सीएसएमटी हून सकाळी 6.20 वाजता 22223 साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस हून सकाळी 8.05 वाजता 15945 दिबृगढ एक्सप्रेस, मुंबई सीएसएमटी हून सकाळी 8.25 वाजता 12534 पुष्पक एक्सप्रेस अशा ट्रेन उपलब्ध आहेत.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
ज्वेलरी बॉक्स मिळतोय फक्त 120 रुपयांपासून, मुंबईत हे आहे लोकेशन
सर्व पहा

जर तुमचं एका दिवसासाठी काही अर्जंट काम निघालं असेल किंवा देव दर्शनासाठीही नाशिकला जात असाल तर तुम्ही नक्कीच या ट्रेन्सचा वापर करू शकणार आहेत. जर समजा तुम्हाला रेल्वेने प्रवास नसेल करायचा तर तुम्ही तुमच्या खासगी कारने सुद्धा जाऊ शकता. नाहीतर, बसने सुद्धा प्रवास करू शकणार आहे. एसटी महामंडळाच्या बसने सुद्धा प्रवास तुमचा सोयीस्कर आणि सोप्पा होऊ शकतो. रेड बस ॲपवरून मिळालेल्या माहितीनुसार, अनेक खासगी बस सुद्धा तुम्हाला उपलब्ध आहेत. सुविधेप्रमाणे तुमच्याकडून ती खासगी बस ट्रॅव्हल कंपनी तुमच्याकडून पैसे घेईल. त्यामुळे जर तुम्ही उद्या नाशिकचा प्रवास करण्याच्या विचारात असाल, तर ही बातमी नक्कीच तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai- Nashik Trains: अचानक नाशिकला जायचंय? टेन्शन नको! सकाळच्या रेल्वेचं अपडेटेड वेळापत्रक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल