मृत व्यक्तीचे नाव राहुल पंजवानी उर्फ पंजाबी असे असून ते चर्चगेट परिसरातच राहत होते. घटनेची माहिती मिळताच आझाद मैदान पोलीस ठाणे येथील पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
उद्यानात नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस नियंत्रण कक्षाला संध्याकाळी एका व्यक्तीचा कॉल आला. ज्या कॉलमध्ये चर्चगेटमधील एका गार्डनजवळ एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे सांगण्यात आले. ही माहिती मिळताच पोलिसांनी कोणताही उशीर न करता घटनास्थळ गाठले.
advertisement
पोलिस घटनास्थळी पोहचले असता राहुल पंजवानी हे गंभीर अवस्थेत जखमी आढळून आले. पोलिसांना त्यांच्या शरीरावर मारहाणीचे आणि हल्ल्याचे वार स्पष्ट दिसत होते. नंतर पोलिसांनी त्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पण डॉक्टरांनी तपासल्यानंतर मृत घोषित केले.
चर्चगेट हत्या प्रकरणाचा तपास वेगात
अचानक गार्डनसारख्या सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकार घटना घडणे ही गंभीर गोष्ट मानली जात आहे, त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या या खुनामागील नेमके कारण समोर आले नाही. नेमका वैयक्तित वाद, आर्थिक कारण आहे किंवा इतर कोणते कारण आहे का याचा तपास पोलीस करत आहे. तपासाला वेग मिळण्यासाठी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरु असून आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष टीम काम करत आहे.
