मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 फेब्रुवारीपासून विधान भवन मेट्रो स्टेशनचे B- 5 गेट बंद करण्यात आले होते. अधिवेशनादरम्यान परिसरात अनेक वरिष्ठ राजकीय नेते आणि मंत्र्यांची उपस्थिती लक्षात घेता, खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने संकुलाच्या सभोवतालचे प्रवेशद्वार बंद केले होते. सामान्य नागरिकांसाठी त्या गेटवरून एन्ट्री आणि एक्झिट बंद केली होती. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस 25 मार्च 2026 रोजी होता. तेव्हापासून सामान्य प्रवाशांसाठीचे निर्बंध आता हटवण्यात आलेले आहेत. प्रशासनाने B- 5 गेटमधून प्रवेश आणि बाहेर येण्याचा मार्ग पुन्हा सुरू केला असून, त्यामुळे प्रवाशांना ये- जा करणं सुलभ झाले आहे.
advertisement
B- 5 गेट सुरू झाल्यामुळे विधीमंडळामध्ये जाणाऱ्या प्रवाशांसाठी एन्ट्री आणि एक्झिट मिळवणं फार सोप्प झालं आहे. हा गेट सुरू झाल्यामुळे प्रवाशंची गर्दी कमी होण्याची आणि गर्दीच्या वेळी प्रवाशांचा प्रवाह सुरळीत होण्याची अपेक्षा आहे. ॲक्वा लाईन मेट्रोने विधान भवन मेट्रो स्टेशनच्या A2 गेटवर लिफ्ट सुविधा कार्यान्वित केल्यानंतर प्रवाशांना ये- जा करण्यासाठी सुलभता वाढली आहे. A2 गेटवरून लिफ्टने आत आणि बाहेर येण्यासाठी प्रवाशांसाठी मार्ग खुला झाला आहे. या लिफ्टच्या सुविधेमुळे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग प्रवासी आणि गर्दीच्या वेळी स्टेशनवरून प्रवास करणाऱ्या दैनंदिन प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. A2 गेटवरून प्रवाशांना मनोरा, नवीन आमदार निवास आणि वाय. बी. चव्हाण सेंटर या दोन्ही ठिकाणी थेट प्रवेश मिळतो, जिथे नेहमीच वर्दळ असते.
