TRENDING:

Mumbai News: पुण्याकडे जाणाऱ्या बसवर थरार छापा, अक्षयच्या बॅगेतील वस्तू पाहून पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली, बस स्टँडवर फिल्मी स्टाईल कारवाई

Last Updated:

मुंबई पोलिसांनी अंमली पदार्थाच्या वाढत्या तस्करीविरोधात मोठी कारवाई केली आहे. मुंबईतून पुण्याकडे जाणाऱ्या एका खासगी बसमधून तब्बल कोट्यवधी रूपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई पोलिसांनी अंमली पदार्थाच्या वाढत्या तस्करीविरोधात मोठी कारवाई केली आहे. मुंबईतून पुण्याकडे जाणाऱ्या एका खासगी बसमधून तब्बल 12 कोटी रूपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आली आहे. मुंबईच्या गुन्हे शाखेने शनिवारी ही कारवाई केली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने केलेल्या या कारवाईमुळे मुंबई आणि पुण्यामध्ये सर्वत्र कसून चौकशी केली जात आहे.
narcotics worth 12 crore rupees seized while being transported from mumbai to pune narcotics worth 2 crore rupees also seized in dombivli
narcotics worth 12 crore rupees seized while being transported from mumbai to pune narcotics worth 2 crore rupees also seized in dombivli
advertisement

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने पुण्याकडे जाणाऱ्या एका खासगी बसवर छापा मारला. यामध्ये पोलिसांनी तब्बल १२ कोटी रूपयांचे अंमली पदार्थ शनिवारी जप्त केलेय. या प्रकरणी अक्षय कांडियली या तरूणाला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या वांद्रे कक्षाचे प्रभारी निरीक्षक सचिन पुराणिक यांना मुंबईहून पुण्याकडे एका खासगी बसमधून अंमली पदार्थांची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारावरच पोलिसांनी कारवाई केलेली आहे. बस रवाना होण्याच्या आधीच पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलला आहे.

advertisement

गुन्हे शाखेने मुंबईहून पुण्याकडे बस जाण्याच्या आधीच विलेपार्ल्यामध्ये कारवाई केली. गुन्हे शाखेच्या प्रभारी निरीक्षकांना मिळालेल्या गुप्त माहितीमध्ये बस विलेपार्लेमध्ये थांबणार असल्याची माहिती मिळाली होती. त्याच आधारावर गुन्हे शाखेने सापळा रचून बस पुण्याकडे जाण्याआधीच कारवाई केली. रचलेल्या सापळ्यामध्ये तपासा दरम्यान अक्षयच्या बॅगेमध्ये साडेतीन किलो एमडी आणि 500 ग्रॅम कोकेन आढळले. ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये किंमत अंदाजे 12 कोटी रूपये आहेत. हे अंमली पदार्थ अक्षय पुण्यामध्ये कोणाला पोहोचवत होता? यातील मुख्य सुत्रधार कोण? अशा एक ना अनेक प्रश्नांची उकल मुंबई पोलिसांची गुन्हे शाखेची टीम सध्या करत आहे.

advertisement

मुंबई पाठोपाठ अंमली पदार्थ विरोधी पथकाने डोंबिवलीतही कारवाई केली आहे. डोंबिवली पूर्वेकडील गणेशनगर आणि उंबर्ली गाव परिसरामध्ये कल्याण परिमंडळ तीनच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने बेधडक कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये 36 वर्षीय नायजेरियन व्यक्तीसह 34 वर्षीय अविनाश सदरला आणि गजेंद्रन नायडू नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाने या तिन्हीही अंमली पदार्थ विक्रेत्यांना शुक्रवारी अटक केली. या तिघांकडून 2 कोटी 15 लाख 80 हजार रूपये किंमतीचे अंमली पदार्थ जप्त केले. अंमली पदार्थ विरोधी पथक रस्त्यावर गस्तासाठी उभे असताना त्यांना काही संशयास्पद हालचाल आढळून आली. त्याचवेळी पोलिसांनी कारवाई केली.

advertisement

अमली पदार्थविरोधी पथक गस्तीवर असताना रस्त्याच्या शेजारी त्या तिघांचीही संशयास्पद हालचाल पोलिसांच्या डोळ्यासमोर आली. त्यापैकी एक जण पाठीवर बॅग घेऊन दुचाकीवर बसला होता. दुचाकीच्या पुढील व मागील नंबर प्लेट वाकवलेल्या अवस्थेत असल्याने पोलिसांचा संशय अधिकच बळावला. अमली पदार्थविरोधी पथकाने चौकशीसाठी जवळ जाताच तिघांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तत्परतेने त्यांना ताब्यात घेतले.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आंब्याची होतीये फळगळ, टाळण्यासाठी करा हे 5 प्रभावी उपाय, होईल फायदा
सर्व पहा

परिमंडळ तीनच्या हद्दीत 2025 या वर्षभरात अंमली पदार्थप्रकरणी पथकाने 101 गुन्हे दाखल करण्यात आले असून 146 आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत गांजा, एमडी, चरस, नायट्राझेपाम गोळ्या, कोडीनयुक्त बॉटल्स असा 6 कोटी 36 लाख 14 हजार 150 रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली आहे.

मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai News: पुण्याकडे जाणाऱ्या बसवर थरार छापा, अक्षयच्या बॅगेतील वस्तू पाहून पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली, बस स्टँडवर फिल्मी स्टाईल कारवाई
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल