पिंक कार्पेटवर अंबानी कुटुंबाची उपस्थिती
वर्धापन दिनाच्या सेलिब्रेशनसाठी नीता अंबानी आणि मुकेश अंबानी स्वतः पिंक कार्पेटवर अवतरले, ज्यामुळे सोहळ्याची शोभा अधिकच वाढली. यावेळी शंकर महादेवन, एहसान नूरानी आणि लॉय मेंडोन्सा या त्रिकुटाने आपल्या सुरांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. गेल्या तीन वर्षांत NMACC ने केवळ भारतीयच नव्हे, तर 'कॅट्स' सारख्या जागतिक दर्जाच्या नाटकांनाही भारतीय रंगमंचावर स्थान दिले आहे.
advertisement
तेलुगु संस्कृतीला मिळालं जागतिक व्यासपीठ
विशेष म्हणजे, NMACC ने केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर दक्षिण भारताच्या संस्कृतीलाही मोठे व्यासपीठ मिळवून दिले आहे. कुचिपुडी नृत्यप्रकार 'बहता पानी' सारख्या सादरीकरणातून तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील कलाकारांनी आपली कला जगासमोर मांडली. तेलंगणाचे सांस्कृतिक मंत्री संदीप यांनीही NMACC चे कौतुक करत म्हटले की, "हैदराबादच्या तरुण कलाकारांसाठी हे केंद्र एक मोठी प्रेरणा आहे."
तीन वर्षांतील सोनेरी टप्पे:
शेकडो आंतरराष्ट्रीय शोज: जगभरातील नामवंत कलाकारांचे सादरीकरण.
'इंडिया इन फॅशन': भारतीय वस्त्रांचा जागतिक वारसा सांगणारे अनोखे प्रदर्शन.
सार्वजनिक कला दालन: सर्वसामान्यांसाठी आधुनिक कलेची दारे उघडली.
नव्या स्वप्नांची सुरुवात: नीता अंबानी यांच्या मते, अजून अनेक कथा शोधायच्या आहेत आणि अनेक स्वप्ने पूर्ण करायची आहेत.
कलाकारांशिवाय केंद्र अपूर्ण!
"कलाकार, रसिक आणि इथला समुदाय यांच्याशिवाय हा प्रवास शक्य झाला नसता," असे नीता अंबानी यांनी आवर्जून सांगितले. रिलायन्स फाउंडेशननेही या प्रवासात साथ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. आज NMACC हे केवळ मुंबईतील एक इमारत उरली नसून, ती भावना, आठवणी आणि भारतीय संस्कृतीचा अभिमान निर्माण करणारं एक जिवंत केंद्र बनलं आहे.
