TRENDING:

Toll Tax Rule Change : मोठा निर्णय; आता महाराष्ट्रातील या मार्गावर टोल वसुली बंद

Last Updated:

No Toll on Incomplete Expressways : वाहन चालकांसाठी आता आनंदाची बातमी समोर आलेली आहे. कारण बाहेर गावी जाताना कदाचित तुमच्या टोलचे पैसे वाचू शकतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : टोलसंदर्भात वाहनचालकांसाठी दिलासादायक निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. सरकारने टोल नियमांमध्ये महत्त्वाचे बदल केले असून त्याचा फायदा एक्सप्रेस-वे प्रवास करणाऱ्या नागरिकांना होणार आहे.
No Toll on Incomplete Expressways
No Toll on Incomplete Expressways
advertisement

जनतेच्या कष्टाचा पैसा वाचणार

नवीन नियमानुसार जर एखादा राष्ट्रीय द्रुतगती महामार्ग पूर्णपणे तयार झालेला नसेल तर त्या मार्गावर एक्सप्रेस-वे दराने टोल आकारला जाणार नाही. यापूर्वी अपूर्ण काम असतानाही वाहनचालकांकडून जास्त दराने टोल वसूल केला जात होता. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी होती.

कधी पासून हा नियम लागू होणार?

15 फेब्रुवारी 2026 पासून हा नवीन नियम लागू होणार आहे. जर एखाद्या एक्सप्रेस-वेचा काही भागच वाहतुकीसाठी खुला असेल तर त्या खुल्या भागावर राष्ट्रीय महामार्गाच्या सामान्य दरानेच टोल आकारला जाईल. म्हणजेच वाहनचालकांना जादा टोल भरावा लागणार नाही.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
केळीचे दर घसरले, आल्याचे भाव तेजीत, डाळींबाची काय स्थिती?
सर्व पहा

सरकारच्या मते या निर्णयामुळे अपूर्ण पण खुल्या असलेल्या रस्त्यांचा वापर अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर होईल. जुन्या महामार्गांवरील वाहतूक कोंडी कमी होईल प्रवासाचा वेळ वाचेल आणि प्रदूषणही घटेल. हा नियम एक वर्षासाठी किंवा संबंधित एक्सप्रेस-वे पूर्णपणे सुरु होईपर्यंत लागू राहणार आहे

मराठी बातम्या/मुंबई/
Toll Tax Rule Change : मोठा निर्णय; आता महाराष्ट्रातील या मार्गावर टोल वसुली बंद
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल