असं का केलं?
मिळालेल्या माहितीनुसार आरोपी व्यक्तीच्या पत्नीचे निधन झाले असून तो आपल्या मुलासोबत मीरा रोड येथे राहतो. त्याने मुलाला मथुरा-वृंदावन येथील एका बोर्डींग शाळेत शिक्षणासाठी ठेवले आहे. 20 डिसेंबर 2024 ते 6 फेब्रुवारी 2025 या काळात जेव्हा मुलगा घरी होता, तेव्हा किरकोळ कारणावरून वडिलांनी त्याला अमानुष वागणूक दिली. जेवण व्यवस्थित न करणे, अभ्यास न करणे अशा साध्या कारणांवरून वडिलांनी मुलाला शिवीगाळ केली आणि गरम इस्त्रीचे चटके दिले.
advertisement
शिक्षकांच्या सतर्कतेमुळे प्रकरण समोर
मुलगा शाळेत परतल्यानंतर शिक्षकांना ही गोष्ट समजून आली. मुलाच्या अंगावरील जखमा पाहून शिक्षकांनी विचारपूस केली असता त्याने वडिलांनी केलेली ही गोष्ट सांगितली. त्यानंतर शिक्षकांनी तातडीने मुलाच्या आजीशी संपर्क साधला. नातेवाईकांच्या मदतीने नवधर पोलिसांनी 23 फेब्रुवारी रोजी मुलाची फिर्याद नोंदवून घेतली आणि वडिलांवर गुन्हा दाखल केला. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
