दीड वर्षांनी उलगडा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकर डांगी(वय३६), बाबू ऊर्फ राघव ऊर्फ अमरचंद गायरी(वय २२) आणि दिनेश गायरी(वय२०) अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहे. त्यातील मुख्य आरोपीने आधी दोन वेळा सुद्धा पत्नीला मारण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्या तो अपयशी ठरला. अखेर पतीने तिच्या हत्येसाठी सुपारी दिली.
2024 मध्ये गीतासोबत काय घडलं?
advertisement
मृत महिला गीता चौधरी या ऑक्टोबर 2024 मध्ये संघर्षनगर येथील त्यांच्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडल्या होत्या. पोलिसांनी सुरुवातीला हा आत्महत्येचा प्रकार असल्याचा अंदाज घेऊन अपघाती मृत्यूची नोंद केली होती. शवविच्छेदनही केलेल्या अहवालात स्पष्ट कारण समोर आले नव्हते.
वडिलांमुळे उघड झाला प्रकरणाचा खरा चेहरा
गीताच्या वडिलांनी तिचा मृतदेह राजस्थान येथे नेला. तेथे दफनविधी पार पडला. पण मुलीच्या मृत्यूनंतर हा प्रकार वडिलांना काही तरी चुकीचे वाटत होते. गीता ही आत्महत्या करु शकत नाही असा तिच्या वडिलांनी ठाम विश्वास व्यक्त केला. त्यांनतर त्यांनी राजस्थानमध्ये तक्रार दिल्यानंतर पुन्हा तपास सुरु करण्यात आला. गीताचा मृतदेह उकरुन पुन्हा तो शवविच्छेदन करण्यात आले आणि ही आत्महत्या नसून हत्या असल्याचे स्पष्ट झाले.
राजस्थान पोलिसांनी नंतर गुन्हा दाखल करुन तपास साकीनाका पोलिसांकडे दिला आणि पुढील तपासाता हा संपूर्ण कट उघड झाला असून पोलिसांनी आरोपींनी अटक करण्यात आलेली आहे.
