TRENDING:

'आमचं वर्ष फुकट घालवलं...', केस न कापल्याची भयानक शिक्षा, मुंबईच्या नामांकित शाळेचं संतापजनक कृत्य

Last Updated:

संतप्त झालेल्या पालकांनी शाळेच्या गेटवरच गोंधळ घातला असून या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई :  मुंबईतील चर्नी रोड परिसरातील नामांकित हायस्कूलमध्ये शिस्तीच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी खेळ सुरू असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. केवळ योग्य हेअरकट नसल्याच्या कारणावरून विद्यार्थ्यांना परीक्षेस बसू न दिल्याने पालकांनी संताप व्यक्त केला असून, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
News18
News18
advertisement

मुंबईतील चर्नी रोड येथील एक हायस्कूलमध्ये शिस्तीच्या नावाखाली एक धक्कादायक प्रकार घडला आहे. शाळेने ठरवून दिलेल्या नियमांनुसार केस कापले नाहीत, या कारणावरून अनेक विद्यार्थ्यांना चक्क परीक्षेला बसू न दिल्याचा आरोप पालकांनी केला आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या पालकांनी शाळेच्या गेटवरच गोंधळ घातला असून या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हायरल झाल्यानंतर शिक्षण क्षेत्रात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, शाळेने विद्यार्थ्यांसाठी काही विशिष्ट नियम लागू केले आहेत. परीक्षेच्या दिवशी सकाळी जेव्हा विद्यार्थी शाळेत पोहोचले, तेव्हा शिक्षकांनी त्यांच्या केसाची तपासणी केली. ज्या विद्यार्थ्यांचे केस नियमापेक्षा लांब होते किंवा ज्यांची हेअरस्टाईल अयोग्य वाटली, अशा विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढण्यात आले. पालकांचा आरोप आहे की, विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू देण्याऐवजी त्यांना वर्गाबाहेर बसवण्यात आले, ज्यामुळे त्यांची महत्त्वाचा पेपर हुकला.

advertisement

पालकांचा शाळेला संतप्त सवाल

केस कापले नाहीत म्हणून मुलांची वर्षभराची मेहनत वाया घालवणार का? असा संतप्त सवाल एका पालकाने व्हिडिओमध्ये विचारला आहे. पालकांच्या मते शिस्त लावण्याचे इतरही मार्ग असू शकतात, पण परीक्षेला बसू न देणे हे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर आणि शैक्षणिक भवितव्यावर परिणाम करणारे आहे.

सोशल मीडियावर संतापाची लाट 

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कांद्याचे दर घसरलेलेचं, लिंबू खातंय चांगलाच भाव, द्राक्षाची काय स्थिती?
सर्व पहा

इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सनी शाळेवर सडकून टीका केली आहे. अनेकांनीही यावर नाराजी व्यक्त केली असून, मुंबई महापालिका आणि शिक्षण विभागाने या प्रकरणाची दखल घेण्याची मागणी होत आहे. दरम्यान या व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देखील शाळेकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया समोर आली नाही.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
'आमचं वर्ष फुकट घालवलं...', केस न कापल्याची भयानक शिक्षा, मुंबईच्या नामांकित शाळेचं संतापजनक कृत्य
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल