TRENDING:

तेलगी स्टॅम्प घोटाळा 2.0, सेम पद्धत अन् कोट्यवधीचा व्यवहार; 14 पाठलाग करून मुंबई पोलिसांनी टोळी पकडली

Last Updated:

पोलिसांनी दिल्लीत तब्बल १४ दिवस पाळत ठेवून आरोपींना अटक केली. हे आरोपी सारखे मोबाईल क्रमांक आणि पत्ता बदलून पळत होते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: तेलंगी स्टॅम्प घोटाळा हा महाराष्ट्रातील कुणाला माहिती नसेल असं कुणीही सापडणार नाही. अब्दुल करीम तेलगीने सरकारी कामासाठी वापऱ्या स्टॅम्पचा कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला होता. आता पुन्हा एकदा तेलगी सारखाच एक स्टॅम्प घोटाळा समोर आला आहे. 27 लाख रुपये किंमतीचे बनावट स्टॅम्प मुंबई पोलिसांनी जप्त केले आहे, या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे.
News18
News18
advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय डाक विभागाच्या नावाने बनावट पोस्टल स्टॅम्प तयार करून ही टोळी काम करत होती. मुंबई पोलिसांच्या रमाबाई आंबेडकर नगर मार्ग पोलिसांनी मोठ्या शिताफीने या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी या प्रकरणात  मुंबईतून राकेश बिंद, बिहारमधून शमशोद्दीन गफार आणि शाहिद रजा, दिल्ली राहणारा मोहम्मद शहाबुद्दीन शेख आणि गाझियाबादमधला विरेंदर प्रसाद अशा आरोपींना अटक केली आहे.

advertisement

असा सुरू होता बनावट स्टॅम्प घोटाळा

पोलिसांनी या टोळीला पकडण्यासाठी दिल्ली आणि बिहारमध्ये धडक कारवाई केली. या टोळीकडून लाखो रुपयांचे बनावट पोस्टल स्टॅम्प जप्त केले आहे. १२ सप्टेंबर २०२५ रोजी मुंबईच्या जी.पी.ओ.चे डाक निरीक्षक आशुतोष जमादारसिंह कुमार यांनी या प्रकरणी तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा हा सगळा प्रकार समोर आला. ही टोळी देशभरात बनावट स्टॅम्पची छपाई करून विकत होते. पोलिसांनी दिल्लीत तब्बल १४ दिवस पाळत ठेवून आरोपींना अटक केली. हे आरोपी सारखे मोबाईल क्रमांक आणि पत्ता बदलून पळत होते. पण, पोलिसांनी अखेरीस १४ दिवसांचा पाठलाग करून या टोळीच्या मुसक्या आवळल्या.

advertisement

बँक खात्यात कोट्यवधीची उलाढाल

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, सोयाबीनच्या दरात मोठी घट, कापसाला काय मिळाला भाव?
सर्व पहा

पोलिसांनी या टोळीच्या मुसक्या आवळल्या तेव्हा चौकशीमध्ये आरोपींच्या बॅँक खात्यात तब्बल ७ ते ८ कोटींची संशयास्पद उलाढाल झाल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी मोठ्या रक्कमेची घेवाणदेवाण झााली असावी असा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणामध्ये आणखी काही जण असणार आहे, असा पोलिसांना अंदाज आहे. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
तेलगी स्टॅम्प घोटाळा 2.0, सेम पद्धत अन् कोट्यवधीचा व्यवहार; 14 पाठलाग करून मुंबई पोलिसांनी टोळी पकडली
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल