TRENDING:

Shocking : शुद्ध सोनं घ्यायला गेले अन् तीन कोटींना डुबले, भिवंडी-ठाण्यात व्यापाऱ्यांनाच चुना, पाहा काय घडलं?

Last Updated:

Crime News : भिवंडी ते ठाणे असा फसवणुकीचा मोठा जाळा उघडकीस आला आहे. एका आमिषाने व्यापाऱ्यांना गंडा घालण्यात आला. पोलिसांनी कारवाई करत कोट्यवधी रुपयांचे सोने आणि लाखोंची रोकड जप्त केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
ठाणे : ठाण्यातील एका सराफा व्यापाऱ्यांना मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत फसवणूक करणाऱ्या आरोपीला अखेर पोलिसांनी अटक केलीय. जिवाराम चौधरी (वय46)असे आरोपीची नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी कोट्यवधींचा ऐवज जप्त केला आहे.
News18
News18
advertisement

कसे अडकले आरोपीच्या जाळ्यात?

मिळालेल्या माहितीनुसार, चौधरी हा स्वत:कडे उच्च दर्जाचे आणि सर्वात कमी किमतीत शुद्द सोने उपलब्ध आहे असे सांगत होता. ठाणे आणि भिवंडी शहरातील सराफा व्यापाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना स्वस्तात सोने देण्याचे आश्वासन देत मोठ्या प्रमाणात पैसे उकळले. पण व्यवहारानंतर ना त्याने सोने दिले ना परत पैसे केले, त्यामुळे व्यापाऱ्यांची मोठी फसवणूक झाली.

advertisement

ठाणेनगर पोलिसांची मोठी कामगिरी

या घडलेल्या प्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात 17 आणि 29 ऑक्टोबर रोजी तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने या प्रकरणाचा तपास सुरु ठेवला होता. या तपासादरम्याने पोलिसांना आरोपी घोडबंदर रोड परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कृषी मार्केटमध्ये मोठी उलथापालथ, केळी आणि कांद्याला कवडीमोल भाव, लिंबाची काय स्थिती?
सर्व पहा

यानंतर 23 मार्च रोजी पोलिसांनी सापळा रचून चौधरीला अटक केली असून न्यायालयाने त्याला 2 एप्रिलपर्यंत कोठडी सुनावली होती. शिवाय पोलिस कोठडीत केलेल्या चौकशीदरम्यान त्याच्याकडून सुमारे तीन कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने आणि 17 लाख 50 हजार रुपयांची रोकड जप्त केली. या प्रकरणाच पुढील तपास अजूनही सुरु आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Shocking : शुद्ध सोनं घ्यायला गेले अन् तीन कोटींना डुबले, भिवंडी-ठाण्यात व्यापाऱ्यांनाच चुना, पाहा काय घडलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल