मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्याच्या ढोकाली परिसरात राहणारे 45 वर्षीय व्यक्ती हे आपल्या पती आणि मुलगा, सासूसोबत अमृतसर येथे पर्यटनासाठी गेले होते. मात्र त्या प्रवासादरम्यान त्यांची ओळख एका रिक्षाचालकाशी झाली आणि काही दिवसांनंतर ते परत ठाण्यात परतले.
मात्र 10 जानेवरी रोजी सकाळी तक्रारदार यांची पत्नी,मुलगा आणि सासू हे घरातून गायब झाले. अखेर काहीच समजत नसल्याने तक्रारदाराने कापूरबावडी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.
advertisement
दरम्याच घरातील कपाटातून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम आणि सुमारे 1 लाख रुपये किंमतीचा कपड्यांचा माल गायब झाल्याचे तक्रार यांच्या लक्षात आले. साधारण 3 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन पत्नी निघून गेल्याचे समजले.
तपासाच समोर आली धक्कादायक गोष्ट
पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आले की, संबंधित तक्रारदार व्यक्तीची महिला ही अमृतसर येथे स्थायिक झाली आहे. या प्रकरणात कापूरबावडी पोलिसांनी मिसिंग तक्रार अखेर निकाली काढली असून पुढील तपास सुरु ठेवला आहे.
