मुंबई महापालिकेच्या एकूण २२७ जागांपैकी ६२ जागांवर वंचित बहुजन आघाडी आपले उमेदवार उभे करणार आहे. तर उर्वरित जागांवर काँग्रेस आपले उमेदवार रिंगणात उतरवणार आहे. वंचित बहुजन आघाडीकडे देण्यात आलेल्या ६२ जागांमध्ये वॉर्ड क्र. ६, ११, १२, ८४, ९५, १२७, १५३ आणि २२५ यांसारख्या विविध महत्त्वाच्या मतदारसंघांचा समावेश आहे. आज वंचितने जाहीर केलेल्या पहिला यादीत एकूण १० उमेदवारांना उमेदवारी जाहीर केली आहे. जाहीर केलेले उमेदवार हे मुंबई उत्तर पश्चिम, उत्तर मध्य मुंबई, ईशान्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबईतील उमेदवारांचा समावश आहे.
advertisement
वंचितने आज वॉर्ड क्रमांक 54, 160, 169, 114, 114, 118, 119, 127, 146, 155,173या वॉर्डचा समावेश आहे.
वंचितची यादी
| उमेदवाराचे नाव | वार्ड क्रमांक | जिल्हा |
| राहुल ठोके | ५४ | मुंबई उत्तर पश्चिम |
| गौतम हराल | १६० | उत्तर मध्य मुंबई |
| स्वप्नील जवळगेकर | १६९ | उत्तर मध्य मुंबई |
| सीमा इंगळे | ११४ | ईशान्य मुंबई |
| सुनीता वीर | ११८ | ईशान्य मुंबई |
| चेतन अहिरे | ११९ | ईशान्य मुंबई |
| वर्षा थोरात | १२७ | ईशान्य मुंबई |
| सतीश राजगुरू | १४६ | दक्षिण मध्य मुंबई |
| ज्योती वाघमारे | १५५ | दक्षिण मध्य मुंबई |
| सुगंधा सोंडे | १७३ | दक्षिण मध्य मुंबई |
तर दुसरीककडे रासप महादेव जानकर यांच्या पक्षाची पहीली यादी जाहीर केली आहे. रासपचे ६ उमेदवार मुंबईतून लढणार आहे.
राष्ट्रीय समाज पक्षाच्या उमेदवारांची यादी
| उमेदवाराचे नाव | वॉर्ड क्रमांक |
| आदित्य यादव | ४० |
| संजय घरत | १०६ |
| सविता उत्तेकर | १०९ |
| प्रतिक्षा जाधव | १३३ |
| वनीता नन्नावरे | १४२ |
| तुषार आंब्रेकर | २२६ |
काँग्रेस आणि वंचितच्या या युतीमुळे मुंबईत दलित, मुस्लिम आणि बहुजन समाजाच्या मतांमध्ये होणारे विभाजन या युतीमुळे थांबण्याची शक्यता आहे. ज्याचा थेट फायदा काँग्रेस-वंचितला होऊ शकतो. एकीकडे उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र आल्याने निर्माण झालेल्या आव्हानाला उत्तर देण्यासाठी काँग्रेसने हा वंचित कार्डचा मास्टरस्ट्रोक वापरल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र या युतीमुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईत कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे.
