TRENDING:

VIDEO : तरुणीने प्रेमप्रकरणातून उचललं टोकाचं पाऊल, फ्लायओव्हरवरून मारली उडी

Last Updated:

तरुणीने फ्लायओव्हरवरून पाण्यात उडी मारल्यानंतर तिला वाचवण्यासाठी काहींनी उडी मारली. तिला बाहेर काढण्यात आलं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्रमोद पाटील,  नवी मुंबई : नवी मुंबईत एका तरुणीने फ्लायओव्हरवरून पाण्यात उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडलीय. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. प्रेम प्रकरणातून तिने हे पाऊल उचलल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान, ती उडी मारत असताना काहींनी याचे व्हिडीओ शूटिंगसुद्धा केले आहे. तरुणी फ्लाय ओव्हरवरून उडी मारण्याच्या प्रयत्नात होती. तिला वाचवण्यासाठी काही जण पुढे गेले पण तिने थेट उडी घेतली.
News18
News18
advertisement

नवी मुंबईतल्या तळोजा परिसरात तरुणीने फ्लायओव्हरवरून उडी मारल्याची घटना समोर आलीय. तळोजा फेज एक आणि फेज दोन यांना जोडणारा फ्लायओव्हर आहे. या फ्लायओव्हरच्या कठड्यावर तरुणी उभा राहिली होती. उडी मारण्याच्या उद्देशानेच ती उभा होती. तरुणीला उडी मारू नको असं तिथे असलेले लोक सांगत होते. पण तिने न ऐकता उडी मारली. या घटनेचा व्हिडीओ काहींनी शूट केला आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबूचे दरात पुन्हा तेजी, कांद्या आणि केळीला काय मिळाला आज भाव? इथं चेक करा
सर्व पहा

तरुणीने फ्लायओव्हरवरून पाण्यात उडी मारल्यानंतर तिला वाचवण्यासाठी काहींनी उडी मारली. तिला बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तरुणीची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजते. प्रेम प्रकरणातून तरुणीने असं पाऊल उचलल्याचं सांगण्यात येतंय. दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
VIDEO : तरुणीने प्रेमप्रकरणातून उचललं टोकाचं पाऊल, फ्लायओव्हरवरून मारली उडी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल