TRENDING:

पॅराग्लिडिंग करताना भीषण अपघात, पर्यटकासह दोघे आकाशातून कोसळले, एकाचा मृत्यू

Last Updated:

पॅराग्लिडिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या हिमाचल प्रदेशातील 'बीर बिलिंग'मध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. इथं एका पायलटचा आकाशातून कोसळून मृत्यू झाला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पॅराग्लिडिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या हिमाचल प्रदेशातील 'बीर बिलिंग'मध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. इथं उड्डाण केल्यानंतर काही वेळातच पॅराग्लिडरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने एका पायलटसह पर्यटक जमीनीवर कोसळला आहे. या भीषण अपघातात मोहन सिंग नावाच्या पायलटचा दुर्दैवी अंत झाला आहे. तर पर्यटक गंभीर जखमी झाला आहे.
News18
News18
advertisement

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी संध्याकाळी घडली. मंडी जिल्ह्यातील बारोट येथील रहिवासी असलेले मोहन सिंग एका पर्यटकासोबत 'टँडम पॅराग्लिडिंग' (दोन व्यक्तींचे उड्डाण) करत होते. टेक ऑफ केल्यानंतर काही क्षणातच हवेत पॅराग्लिडरचा समतोल बिघडला आणि तो लाँच साईटजवळच कोसळला. तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज 'बीर बिलिंग पॅराग्लिडिंग असोसिएशन'ने व्यक्त केला आहे.

advertisement

पायलटचा मृत्यू, पर्यटक थोडक्यात बचावला

अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि बचाव पथकाने तातडीने मोहन सिंग आणि जखमी पर्यटकाला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, मोहन सिंग हे गंभीर जखमी असल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सुदैवाने, सोबत असलेल्या पर्यटकाला किरकोळ दुखापत झाली असून प्राथमिक उपचारानंतर त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं सांगण्यात आलं आहे.

तपास सुरू, सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शनिवारी डाळिंबाला उच्चांकी भाव, शेवग्याचं मार्केट हाललं, गुळाचे दर काय?
सर्व पहा

या घटनेनंतर प्रशासनाने गुन्हा दाखल केला असून सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. हा अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाला की मानवी चुकीमुळे, याचा तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे एडव्हेंचर स्पोर्ट्समधील सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. कांगडा जिल्ह्याचे पर्यटन अधिकारी विनय कुमार यांनी सांगितले की, "घटनास्थळावरील मार्शल आणि तांत्रिक सल्लागारांकडून सर्व माहिती मागवण्यात आली असून अहवालानुसार पुढील कारवाई केली जाईल."

advertisement

मराठी बातम्या/देश/
पॅराग्लिडिंग करताना भीषण अपघात, पर्यटकासह दोघे आकाशातून कोसळले, एकाचा मृत्यू
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल