TRENDING:

सर्वांत मोठी बातमी: देशात जातनिहाय जनगणना होणार, मोदी सरकारचा बिहार निवडणुकीपूर्वी मोठा निर्णय

Last Updated:

आगामी जनगणनेत आता नागरिकांच्या जातीची माहिती देखील समाविष्ट केली जाणार आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. मात्र यासोबतच राजकीय फायद्यासाठी जाती सर्वेक्षणाचा वापर करणाऱ्या विरोधी पक्षांवर केंद्राने जोरदार टीका केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली: केंद्र सरकारने बुधवारी आगामी जनगणनेत जातीआधारित माहिती समाविष्ट करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली. या निर्णयासोबतच केंद्र सरकारने विरोधी पक्षांनी जाती सर्वेक्षणाचा वापर राजकीय फायद्यासाठी केल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.
News18
News18
advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय राजकीय व्यवहार समितीच्या (Central Committee on Political Affairs - CCPA) बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर दिली.

वैष्णव म्हणाले की अनेक राज्यांमध्ये करण्यात आलेली जाती जनगणनेची प्रक्रिया "अवैज्ञानिक" आहे. यापूर्वी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) शासित बिहारसह अनेक राज्यांनी जाती जनगणनेची आकडेवारी प्रकाशित केली आहे.

advertisement

बिहारमधील जाती सर्वेक्षण जे स्वतंत्र भारतातील पहिले यशस्वी सर्वसमावेशक जाती सर्वेक्षण ठरले. त्यानुसार राज्यात इतर मागासवर्गीय (OBC) लोकसंख्या 63.13% आहे. अनुसूचित जाती (SC) 19.65% आणि अनुसूचित जमाती (ST) 1.68% आहेत. तर "उच्च" जातींची लोकसंख्या 15.52% आढळली.

याव्यतिरिक्त 19 जानेवारी रोजी आंध्र प्रदेश सरकारने त्यांच्या राज्यातील लोकांच्या जातीआधारित माहितीचा एक व्यापक डेटाबेस तयार करण्याच्या उद्देशाने एक सर्वेक्षण सुरू केले.

advertisement

कर्नाटक मंत्रिमंडळासमोर 11 एप्रिल रोजी सादर करण्यात आलेल्या सामाजिक-आर्थिक आणि शैक्षणिक सर्वेक्षण अहवालात राज्यातील 5.98 कोटी लोकांच्या सर्वेक्षणात 1,351 जाती आणि उपजातींची नोंद करण्यात आली.

कर्नाटक राज्य मागासवर्गीय आयोगाने केलेल्या या सर्वेक्षणाला सामान्यतः जाती जनगणना म्हणून ओळखले जाते. यात राज्यातील विविध जातींच्या उपगटांची गणना करण्यात आली. ज्यात लिंगायत समाजातील 91 उपजाती आणि वोक्कालिगा समाजातील 49 उपजातींचा समावेश आहे. मुस्लिमांना 100 उपजातींमध्ये वर्गीकृत केले गेले. तर ख्रिश्चनांना 58 उपजातींमध्ये गटबद्ध केले गेले – जे ब्राह्मणांच्या 59 उपजातींपेक्षा एकने कमी आहेत.

advertisement

या सर्वेक्षणात लिंगायत आणि वोक्कालिगा समाजाची एकत्रित लोकसंख्या कर्नाटकाच्या एकूण लोकसंख्येच्या 21.3% असल्याचे आढळले. यापूर्वी, या दोन प्रभावी जाती राज्याच्या लोकसंख्येच्या जवळपास एक तृतीयांश असल्याचा दावा केला जात होता.

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे आगामी काळात देशातील सामाजिक आणि राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. विरोधक यावर काय भूमिका घेतात आणि या निर्णयाचा निवडणुकीच्या निकालांवर कसा परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे असेल.

advertisement

मराठी बातम्या/देश/
सर्वांत मोठी बातमी: देशात जातनिहाय जनगणना होणार, मोदी सरकारचा बिहार निवडणुकीपूर्वी मोठा निर्णय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल