TRENDING:

Exclusive: बॉर्डरवरून पाकिस्तानवर निर्णायक वार, काश्मीरात Mega Projectला अधिकृत सुरुवात; एकाच वेळी 4 धाडसी आदेश जारी

Last Updated:

Hydroelectric Project: सिंधू जलकरार स्थगित झाल्यानंतर भारताने चिनाब नदीवर 5,129 कोटींच्या सावलकोट जलविद्युत प्रकल्पाचे काम सुरू केले आहे. या प्रकल्पामुळे केवळ वीज निर्मितीच नव्हे, तर पाकिस्तानसाठी अत्यंत संवेदनशील असलेल्या पाण्याच्या प्रवाहावर भारताची पकड मजबूत होणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
भारताने जम्मू-काश्मीरमधील चिनाब नदीवर प्रस्तावित असलेल्या 5,129 कोटी रुपयांच्या ‘सावलकोट जलविद्युत प्रकल्पा’च्या कामाला अधिकृत सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे सिंधू जलकरार (Indus Water Treaty) प्रभावीपणे स्थगित झाल्यानंतर नरेंद्र मोदी सरकारने मंजुरी दिलेला हा पहिलाच नवा मोठा प्रकल्प आहे.
News18
News18
advertisement

News18 ला राष्ट्रीय जलविद्युत महामंडळ (NHPC) लिमिटेडची महत्त्वाची कागदपत्रे मिळाली असून, त्यानुसार 5 फेब्रुवारी रोजी NHPC ने उदमपूर आणि रामबन जिल्ह्यांमध्ये हा भव्य प्रकल्प उभारण्यासाठी कंपन्यांकडून निविदा मागवल्या आहेत.

सावलकोट जलविद्युत प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात 1,406 मेगावॅट, तर दुसऱ्या टप्प्यात 450 मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प उभारला जाणार आहे. हा प्रकल्प चिनाब नदीवर वरच्या बाजूला बागलीहार आणि खालच्या बाजूला सलाल प्रकल्पांच्या मधोमध उभारला जाणार असून, तो पूर्णपणे ‘रन-ऑफ-द-रिव्हर’ प्रकारचा असेल.

advertisement

News18 ने पाहिलेल्या कागदपत्रांमध्ये नमूद करण्यात आले आहे की, “प्रकल्प शक्य तितक्या लवकर कार्यान्वित व्हावा, यासाठी बांधकाम पद्धती आणि यंत्रसामग्रीची निवड अतिशय काटेकोरपणे करण्यात आली आहे.” या मजकुरातून सरकारची आणि यंत्रणांची तातडीची मानसिकता स्पष्टपणे दिसून येते.

सिंधू जलकरार स्थगित झाल्यानंतर रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाच्या प्रकल्पांवर वेगाने काम सुरू करण्याच्या दृष्टीने, पर्यावरण मंत्रालयाच्या तज्ज्ञ समितीने ऑक्टोबर 2025 मध्ये या 1,856 मेगावॅट प्रकल्पाला मंजुरी दिली होती. त्यानंतर आता NHPC ने प्रत्यक्ष बांधकामासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.

advertisement

कागदपत्रांनुसार आवश्यक प्रारंभिक तयारी आणि यंत्रसामग्रीच्या उभारणीनंतर मुख्य बांधकामाला सुरुवात होईल. या भागात वर्षातील 12 महिने भूमिगत कामे सुरू ठेवता येतील, तर पृष्ठभागावरील कामे पावसाळ्याबाहेर पूर्ण क्षमतेने आणि पावसाळ्यात सुमारे 50 टक्के गतीने केली जातील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. या प्रकल्पाला पूर्णत्वास जाण्यास सुमारे 9 वर्षांचा कालावधी लागू शकतो, असेही नमूद करण्यात आले आहे.

advertisement

जम्मू-काश्मीरमधील प्रकल्पांना युद्धपातळीवर गती

News18 ने गेल्या महिन्यात दिलेल्या वृत्तानुसार, केंद्र सरकारने चिनाब नदी प्रणालीवरील चार प्रमुख जलविद्युत प्रकल्प जलदगतीने पूर्ण करण्याचे ठोस आदेश दिले आहेत. यामध्ये पाकल दुल आणि किरू प्रकल्प डिसेंबर 2026 पर्यंत कार्यान्वित करणे, क्वार प्रकल्प मार्च 2028 पर्यंत पूर्ण करणे आणि रणनीतिकदृष्ट्या अत्यंत संवेदनशील असलेल्या रॅटल धरणाच्या कामाला वेग देणे यांचा समावेश आहे.

advertisement

यातील सर्वात महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे किश्तवाडमधील 1,000 मेगावॅट क्षमतेचा पाकल दुल प्रकल्प. 167 मीटर उंचीचे हे धरण भारतातील सर्वात उंच धरण असून, चिनाब खोऱ्यातील सर्वात मोठा प्रकल्प आहे. महत्त्वाचे म्हणजे, पाकल दुल हा पाकिस्तानमध्ये जाणाऱ्या पश्चिमेकडील नदीवर उभारला जाणारा भारताचा पहिला ‘स्टोरेज’ प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मे 2018 मध्ये केले होते.

सिंधू जलकरार प्रत्यक्षात स्थगित अवस्थेत गेल्यानंतर, केंद्र सरकारने पाकल दुल डिसेंबर 2026 पर्यंत सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर भारताला केवळ वीज निर्मितीच नव्हे, तर पाण्याच्या प्रवाहाचे नियमन करण्याची क्षमता मिळणार आहे. हीच बाब पाकिस्तानसाठी सर्वात मोठी चिंता ठरली आहे.

याचवेळी किरू प्रकल्पही किश्तवाड जिल्ह्यातच उभारला जात असून, तो 135 मीटर उंचीचा ‘रन-ऑफ-द-रिव्हर’ प्रकल्प आहे. तो स्वतंत्रपणे छोटा वाटत असला, तरी वरखाली असलेल्या प्रकल्पांच्या साखळीत बसल्यामुळे त्याचे रणनीतिक महत्त्व मोठे आहे. केंद्र सरकारने किरू प्रकल्पालाही डिसेंबर 2026 चीच मुदत दिली आहे. म्हणजे दोन्ही प्रकल्प एकाच वेळी कार्यान्वित होणार आहेत.

तिसरा महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे 109 मीटर उंचीचा क्वार प्रकल्प. जानेवारी 2024 मध्ये चिनाब नदीचे यशस्वी वळण (diversion) करून बांधकाम सुरू करण्यात आले, ही घटना पाकिस्तानने अत्यंत बारकाईने लक्षात घेतली होती. आता हा प्रकल्प मार्च 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

यानंतर येतो सर्वात वादग्रस्त 850 मेगावॅट क्षमतेचा रॅटल प्रकल्प. 133 मीटर उंचीच्या या धरणाच्या स्पिलवे डिझाइनवर पाकिस्तानने अनेक वर्षे आक्षेप घेतले आहेत. अलीकडील दौऱ्यात केंद्रीय ऊर्जा मंत्र्यांनी या धरणाच्या काँक्रिटिंग कामाचे भूमिपूजन केले. याचा अर्थ रॅटल प्रकल्प आता पूर्ण वेगाने पुढे जात आहे. 2024 मध्येच या प्रकल्पासाठी चिनाब नदी बोगद्यांमधून वळवण्यात आली होती आणि 2028 पर्यंत धरण पूर्ण होण्याची शक्यता आहे.

या व्यतिरिक्त चिनाब नदीवरील दुलहस्ती स्टेज-2 प्रकल्पालाही मंजुरी देण्यात आली आहे. हा प्रकल्प आधीच कार्यरत असलेल्या दुलहस्ती-1 नंतर उभारला जाणार आहे. पाकिस्तानने यावरही आक्षेप घेतला असून, आपल्याला माहिती न देता मंजुरी दिल्याचा आरोप केला आहे, मात्र भारताने तो फेटाळून लावला आहे.

पाकिस्तान का अस्वस्थ आहे?

चिनाब नदी सिंधू खोऱ्याचा भाग असून, तो पाकिस्तानसाठी अक्षरशः जीवनवाहिनी आहे. पाकिस्तानच्या एकूण पाण्यापैकी जवळपास तीन-चतुर्थांश पाणी पश्चिमेकडील नद्यांतून येते, ज्या भारतातून पाकिस्तानमध्ये प्रवेश करतात. पाकिस्तानच्या 90 टक्क्यांहून अधिक शेतीचे अस्तित्व याच सिंधू खोऱ्यावर अवलंबून आहे, तसेच देशातील जवळपास संपूर्ण कालवे-धरणे याच पाण्यावर आधारित आहेत.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात मोठी वाढ, तूर आणि कांद्याला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

थोडक्यात सांगायचे तर, दहा पैकी नऊ पाकिस्तानी नागरिक असे आहेत, ज्यांचे जीवन भारतातून वाहून जाणाऱ्या पाण्यावर अवलंबून आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सिंधू जलकराराशी संबंधित सर्व प्रक्रिया व बैठकांवर बहिष्कार टाकला आहे, आणि याच पार्श्वभूमीवर हे सर्व प्रकल्प पाकिस्तानसाठी अधिक चिंतेचे कारण ठरत आहेत.

मराठी बातम्या/देश/
Exclusive: बॉर्डरवरून पाकिस्तानवर निर्णायक वार, काश्मीरात Mega Projectला अधिकृत सुरुवात; एकाच वेळी 4 धाडसी आदेश जारी
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल