TRENDING:

Aditya L1 Mission: चंद्रानंतर भारताची सूर्याकडे झेप; ISRO चं सूर्य मिशन आज होणार लॉन्च, कसं करणार काम?

Last Updated:

ISRO ने तयार केलेलं आदित्य-L1 अंतराळयान 2 सप्टेंबर रोजी (आज) प्रक्षेपणासाठी सज्ज आहे. सूर्याविषयी माहिती संकलित करण्यासाठी भारत प्रथमच मोहीम राबवत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली 02 सप्टेंबर : चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशात चांद्रयान-3 च्या यशस्वी सॉफ्ट लँडिंगनंतर, भारत आता सूर्याकडे झेप घेणार आहे. ISRO ने तयार केलेलं आदित्य-L1 अंतराळयान 2 सप्टेंबर रोजी (आज) प्रक्षेपणासाठी सज्ज आहे. सूर्याविषयी माहिती संकलित करण्यासाठी भारत प्रथमच मोहीम राबवत आहे. याच्या यशासाठी इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी आंध्र प्रदेशातील तिरुपती जिल्ह्यातील चंगलम्मा परमेश्वरी मंदिरात प्रार्थना केली.
ISRO चं सूर्य मिशन आज होणार लॉन्च
ISRO चं सूर्य मिशन आज होणार लॉन्च
advertisement

या मोहिमेबाबत इस्रोने सांगितलं की, सूर्य मोहिमेची उलटी गिनती सुरू झाली आहे. ही मोहीम 2 सप्टेंबर रोजी सकाळी 11.50 वाजता आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा अंतराळ स्थानकावरून प्रक्षेपित केली जाईल. त्याची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. लॉन्च झाल्यानंतर 127 दिवसांनी ते त्याच्या पॉइंट L1 वर पोहोचेल.

इस्रो प्रमुख म्हणाले की, आदित्य एल-1 मोहीम ही सूर्याचे निरीक्षण करणारी इस्रोची पहिली समर्पित अंतराळ मोहीम असणार आहे. प्रक्षेपणाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. रॉकेट आणि उपग्रह तयार आहेत. प्रक्षेपणाची तालीमही पूर्ण झाली आहे. इस्रोचे सर्वात विश्वासार्ह रॉकेट PSLV-C57 आदित्य-L1 पृथ्वीच्या खालच्या कक्षेत प्रक्षेपित करेल. यानंतर, तीन किंवा चार कक्षा चालवल्यानंतर ते थेट पृथ्वीच्या प्रभाव क्षेत्राच्या (SOI) बाहेर जाईल. त्यानंतर क्रूझचा टप्पा सुरू होईल. हे थोडं जास्त काळ चालेल.

advertisement

मिशनचा उद्देश -

सूर्यातून बाहेर पडणाऱ्या उष्णता आणि उष्ण वाऱ्यांचा आदित्य अभ्यास करणार आहे. ते सौर वातावरण समजून घेण्याचा प्रयत्न करेल. यासोबतच सौर वाऱ्यांचे कारण आणि तापमानाचा अभ्यास करेल. सौर वादळे, सौर लहरी आणि त्यांचा पृथ्वीच्या वातावरणावर होणारा परिणाम याचे कारणही अभ्यासणार आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: कृषी मार्केटमध्ये उलटफेर, कांदा, केळीनं वाढवलं टेन्शन, लिंबू अन् द्राक्षांना किती मिळाला भाव?
सर्व पहा

आदित्य-एल1 ही भारताची पहिली सौर मोहीम आहे. आदित्य-L1 अंतराळयान पृथ्वी आणि सूर्यादरम्यानच्या L1 कक्षेत ठेवण्यात येणार आहे. म्हणजेच, सूर्य आणि पृथ्वी प्रणाली दरम्यान उपस्थित असलेला पहिला लॅरॅंजियन बिंदू. म्हणूनच त्याच्या नावात L1 जोडले आहे. L1 हे खरं तर अंतराळातील पार्किंग स्पेस आहे. जिथे अनेक उपग्रह तैनात आहेत. भारताचे सूर्ययान पृथ्वीपासून 15 लाख किमी अंतरावर असलेल्या या बिंदूपासून सूर्याचा अभ्यास करेल. ते सूर्याच्या जवळ जाणार नाही.

advertisement

मराठी बातम्या/देश/
Aditya L1 Mission: चंद्रानंतर भारताची सूर्याकडे झेप; ISRO चं सूर्य मिशन आज होणार लॉन्च, कसं करणार काम?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल