ही राजकीय संघटना नाही. मात्र, लोकांमध्ये खोलवर असलेल्या प्रभावामुळे राजकीय पक्षांमध्ये करणी सेनेची पकड मजबूत आहे. संस्थेचे नाव करणी मातेच्या नावावरून ठेवण्यात आले, ज्याला तिच्या अनुयायांनी हिंगलाज मातेचा अवतार मानले आहे. हिंगलाज माता हे 51 शक्तीपीठांपैकी एक आहे, ज्यांचे मंदिर बलुचिस्तान, पाकिस्तानमध्ये आहे. वास्तविक, राजस्थानच्या प्रमुख शहरांमध्ये अनेक राजपूत संघटना कार्यरत आहेत. क्षत्रिय युवक संघटना अनेक दशकांपासून राजपूतांच्या कल्याणासाठी कार्यरत आहेत. या सगळ्यात करणी सेनेने वेगळा मार्ग स्वीकारत तरुणांवर लक्ष केंद्रित केले.
advertisement
पद्मावत चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान करणी सेना लोकप्रिय
2017 पूर्वी देशातील जनतेला करणी सेनेबद्दल फारशी माहिती नव्हती. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावत चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळी अचानक देशभरात करणी सेनेचं नाव पोहचलं. करणी सेनेच्या हाकेवर जयपूरमध्ये हजारो तरुण जमले आणि त्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध सुरू केला. या काळात त्यांनी अनेक सिनेमागृहांची तोडफोडही केली.
वाचा - मोठी बातमी! राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या अध्यक्षांची गोळ्या झाडून हत्या; राजस्थानात खळबळ
राजस्थानच्या राजकारणात करणी सेनेचे महत्त्व काय?
करणी सेनेचा तीव्र विरोध असूनही 2017 मध्ये पद्मावत हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. राजपूत समाजात या चित्रपटाबद्दल प्रचंड नाराजी होती. पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत याचा फटका तत्कालीन मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना सहन करावा लागल्याचे मानले जात आहे. राजपूत समाजाच्या नाराजीमुळे भाजपला राज्यातील सत्ता गमवावी लागली.
करणी सेनेचे तीन गट
राजपूत समाजात करणी सेनेची लोकप्रियता वाढल्याने संघटनेचे तीन भाग झाले. सध्या तीन गट करणी सेना म्हणून ओळखले जातात. श्री राजपूत करणी सेना, श्री राजपूत करणी सेवा समिती आणि श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना अशी त्यांची नावे आहेत. तिन्ही संघटना आपापल्या परीने राजपूत समाजासाठी काम करत आहेत.