मोठी बातमी! राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या अध्यक्षांची गोळ्या झाडून हत्या; राजस्थानात खळबळ
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
जयपूरमधून मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची हत्या करण्यात आली आहे.
जयपूर, 5 डिसेंबर : जयपूरमधून मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची हत्या करण्यात आली आहे. जयपूरमध्ये त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. या हल्ल्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. सुखदेव सिंह गोगामेडी यांच्या घरात घुसून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात जखमी झालेल्या सुखदेव सिंह गोगामेडी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषीत केलं. या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. या घटनेमुळं तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. सुखदेव सिंह गोगामेडी यांच्यावर हल्लेखाराने एकूण चार गोळ्या झाडल्या. त्यांच्या श्याम नगर परिसरात असलेल्या घरात घुसून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. या घटनेनंतर पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे. हल्लेखोरांबाबत अद्याप कुठलीही माहिती समोर आलेली नाहीये.
advertisement
राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची हत्या करण्यात आली आहे. ही बातमी राज्यात वणव्या सारखी पसरली. जयपूर शहरातील पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे. तसेच राज्याच्या इतर शहरातील पोलिसां देखील सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हल्लेखोरांबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाहीये.
Location :
Jaipur,Jaipur,Rajasthan
First Published :
December 05, 2023 3:35 PM IST
मराठी बातम्या/देश/
मोठी बातमी! राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या अध्यक्षांची गोळ्या झाडून हत्या; राजस्थानात खळबळ