Pune Zilla Parishad: बारामतीत दादांच्या राष्ट्रवादीचा जलवा, कोणी कोणी मारली बाजी?
- Published by:Prachi Amale
Last Updated:
प्रचार सभांशिवाय पार पडलेली ही बारामतीच्या इतिहासातील पहिलीच निवडणूक ठरली आहे.
पुणे : बारामती तालुक्यात राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात मुख्य लढत पाहायला मिळाली. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती तालुक्यात पार पडणारी ही जिल्हा परिषद व पंचायत समितीची गेल्या ४० वर्षांतील पहिलीच निवडणूक ठरली. त्यांच्या निधनामुळे कोणत्याही पक्षाने प्रचार सभा न घेता निवडणूक प्रक्रिया पार पडली. प्रचार सभांशिवाय पार पडलेली ही बारामतीच्या इतिहासातील पहिलीच निवडणूक ठरली आहे.
बारामती तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या मतमोजणीला आज सुरुवात होत असून, चुरशीच्या लढतींमुळे निकालाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. ग्रामीण भागातील सत्तासमीकरणे ठरवणाऱ्या या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, अनेक गटांमध्ये लढत शेवटच्या फेरीपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
नीरा वागज- डोर्लेवाडी
वडगाव सांगवी
नंबुत वागळवाड
मोरगाव- मुढाळे
गुणवडी - पणदरे
advertisement
काटेवाडी- शिर्सुफळ
सुपा -काऱ्हाटी
राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी मतदान प्रक्रिया सुरू आहे. या निवडणुकीच्या रिंगणात एकूण ७४३८ उमेदवार असून, ७३१ जिल्हा परिषद जागा आणि १४६२ पंचायत समिती जागांसाठी मतदान होत आहे
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 09, 2026 4:36 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Zilla Parishad: बारामतीत दादांच्या राष्ट्रवादीचा जलवा, कोणी कोणी मारली बाजी?






