advertisement

Pune ZP Election Result: पुरंदरमध्ये बापूंची प्रतिषठा पणाला, कोण बाजी मारणार? पुंरदरकरांची साथ कोणाला?

Last Updated:

भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उबाठा) आणि काँग्रेस यांच्यातील थेट  तिरंगी व काही ठिकाणी चौरंगी लढतींमुळे निकाल कोणाच्या बाजूने लागणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

News18
News18
पुणे: पुरंदर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत चुरशीच्या लढतींमुळे सत्तासमीकरणे ढवळून निघाली आहेत. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उबाठा) आणि काँग्रेस यांच्यातील थेट  तिरंगी व काही ठिकाणी चौरंगी लढतींमुळे निकाल कोणाच्या बाजूने लागणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
गारडे, वीर, बेलसर आणि निरा-शिवतकर या जिल्हा परिषद गटांमध्ये अत्यल्प फरकाने आघाडी-पिछाडी सुरू असून प्रत्येक फेरीसोबत चित्र बदलत असल्याचे दिसून येत आहे.

जिल्हा परिषद गट 

  • गारडे – निकाल अपेक्षित
  • वीर – निकाल अपेक्षित
  • बेलसर – निकाल अपेक्षित
  • निरा-शिवतकर – निकाल अपेक्षित

स्थानिक राजकीय समीकरण व मतदानाचा आढावा

या निवडणुकीत पुरंदर तालुक्यातील स्थानिक राजकीय समीकरणे निर्णायक ठरल्याचे चित्र आहे. काही भागांमध्ये पारंपरिक पक्षनिष्ठा कायम राहिली असली, तरी अनेक ठिकाणी स्थानिक नेतृत्व, अंतर्गत बंडखोरी आणि गटांतर्गत संघर्षाचा थेट परिणाम मतदानावर दिसून आला.
advertisement
तालुक्यात यावेळी सरासरी 68.37 टक्के मतदान झाले आहे. ग्रामीण भागात मतदानाचा प्रतिसाद तुलनेने चांगला राहिला, तर शहरी भागात काही प्रमाणात उदासीनता दिसून आली. या सर्व घटकांचा निकालावर थेट परिणाम झाल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक कार्यक्रम (2026)

  • निवडणूक अधिसूचना: 16 जानेवारी 2026
  • उमेदवारी अर्ज दाखल: 16 ते 21 जानेवारी 2026
  • अर्जांची छाननी: 22 जानेवारी 2026
  • उमेदवारी माघार: 27 जानेवारी 2026
  • प्रचाराची सांगता: 5 फेब्रुवारी 2026 (रात्री 10 वाजेपर्यंत)
  • मतदान: 7 फेब्रुवारी 2026 (शनिवार)
  • मतमोजणी: 9 फेब्रुवारी 2026, सकाळी 10 वाजता
advertisement
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune ZP Election Result: पुरंदरमध्ये बापूंची प्रतिषठा पणाला, कोण बाजी मारणार? पुंरदरकरांची साथ कोणाला?
Next Article
advertisement
सूर्यास्तानंतर आकाशात काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका; उघड्या डोळ्यांनी दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
सूर्यास्तानंतर काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका;दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
  • 28 फेब्रुवारीची रात्र ठरणार 'कयामत'

  • दृश्य पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

  • रहस्यमयी रांग आणि पृथ्वीवरचा परिणाम...

View All
advertisement