Pune ZP Election Result 2026: जुन्नरमध्ये कोण मारणार बाजी? सत्ता समीकरणे कुणाच्या बाजूने झुकणार?
- Published by:Prachi Amale
Last Updated:
जुन्नर तालुक्यातील 8 जिल्हा परिषद गट आणि 16 पंचायत समिती गणांमध्ये मोजणी टप्प्याटप्प्याने होत असून, प्रत्येक फेरीसोबत आघाडी-पिछाडीचे चित्र बदलत असल्याचे दिसून येत आहे.
पुणे : जुन्नर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या मतमोजणीला आज सुरुवात होत असून, चुरशीच्या लढतींमुळे निकालाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. ग्रामीण भागातील सत्तासमीकरणे ठरवणाऱ्या या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, अनेक गटांमध्ये लढत शेवटच्या फेरीपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
पिंपळवंडी, बोरी, राजुरी, बारव, ओतूर, डिंगोरे-उदापूर आणि सावरगाव या गटांमध्ये अंतर्गत बंडखोरी, तिरंगी-चौरंगी लढती आणि पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधील थेट सामना यामुळे जुन्नरमधील राजकीय चित्र अधिक रंगतदार झाले आहे.
जुन्नर तालुक्यातील 8 जिल्हा परिषद गट आणि 16 पंचायत समिती गणांमध्ये मोजणी टप्प्याटप्प्याने होत असून, प्रत्येक फेरीसोबत आघाडी-पिछाडीचे चित्र बदलत असल्याचे दिसून येत आहे. मतमोजणी केंद्र परिसरात समर्थकांची गर्दी वाढली असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस बंदोबस्त कडक ठेवण्यात आला आहे.
advertisement
जिल्हा परिषद गट
पिंपळवंडी – निकाल अपेक्षित
बोरी – निकाल अपेक्षित
राजुरी – निकाल अपेक्षित
बारव – निकाल अपेक्षित
ओतूर – निकाल अपेक्षित
डिंगोरे-उदापूर – निकाल अपेक्षित
सावरगाव – निकाल अपेक्षित
या निवडणुकीत जुन्नर तालुक्यातील स्थानिक राजकीय समीकरणे निर्णायक ठरताना दिसत आहेत. काही गटांत बंडखोरी आटोक्यात आली असली, तरी काही ठिकाणी अंतर्गत संघर्ष कायम राहिल्याने लढती अधिक चुरशीच्या झाल्या आहेत. तिरंगी व चौरंगी लढतींचा थेट परिणाम अंतिम निकालावर होण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 09, 2026 4:26 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune ZP Election Result 2026: जुन्नरमध्ये कोण मारणार बाजी? सत्ता समीकरणे कुणाच्या बाजूने झुकणार?






