Pune Zilla Parishad: दौंडमध्ये दादा वि.आप्पा कोण मारणार बाजी? गाववाल्यांची साथ कोणाला?
- Published by:Prachi Amale
Last Updated:
दौंड तालुक्यात अनेक ठिकाणी आमदार राहुल कुल आणि माजी आमदार रमेश थोरात यांच्या गटांमध्ये थेट लढत झाली आहे
पुणे : दौंड तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या मतमोजणीला आज सुरुवात होत असून, तब्बल 68.48 टक्के मतदानानंतर सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. ‘मिनी मंत्रालय’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे जिल्हा परिषदेच्या या निवडणुकीत अनेक राजकीय दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली असून निकालाबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. मतमोजणी केंद्र परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून प्रशासन सतर्क आहे.
दौंड तालुक्यात अनेक ठिकाणी आमदार राहुल कुल आणि माजी आमदार रमेश थोरात यांच्या गटांमध्ये थेट लढत झाली आहे. काही गणांमध्ये भाजप–राष्ट्रवादी–शिवसेना किंवा अपक्ष अशी तिरंगी लढत असल्याचे चित्र असून फरक अत्यल्प असल्याची माहिती आहे.
जिल्हा परिषद – गटवार स्थिती
- राहू खामगाव
- वरवंड पारगाव
- गोपाळवाडी कानगाव
- खडकी देऊळगावराजे
- पाटस कुरकुंभ
- बोरीपार्धी
- यवत बोरीभडक
अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
advertisement
दौंड तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून आमदार राहुल कुल आणि माजी आमदार रमेश थोरात यांच्यातील संघर्ष केंद्रस्थानी राहिला आहे. यंदाच्या निवडणुकीतही दोन्ही गटांमध्ये अनेक ठिकाणी थेट लढत झाली आहे. या निवडणुकीत तुषार थोरात, अभिषेक थोरात, विरधवल जगदाळे, आप्पासाहेब पवार, नामदेव ताकवणे, संजय दिवेकर, सत्वशील शितोळे यांसह अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
advertisement
दौंड तालुक्यात 68.48 टक्के मतदान
दौंड तालुक्यात यावेळी 68.48 टक्के मतदान झाले असून ग्रामीण भागात मतदारांचा सहभाग लक्षणीय राहिला. प्रतिष्ठेच्या लढती, स्थानिक नेतृत्व आणि पारंपरिक वर्चस्वाला मिळालेले आव्हान यामुळे मतदानाचा टक्का वाढल्याचे चित्र आहे. या सर्व घटकांचा अंतिम निकालावर निर्णायक प्रभाव राहण्याची शक्यता राजकीय निरीक्षक व्यक्त करत आहेत.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 09, 2026 4:21 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Zilla Parishad: दौंडमध्ये दादा वि.आप्पा कोण मारणार बाजी? गाववाल्यांची साथ कोणाला?









