TRENDING:

पंतप्रधानांनी मलेशियातील निवडक अनिवासी भारतीयांबरोबर साधला संवाद

Last Updated:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मलेशियातील अनिवासी भारतीय सदस्यांसोबत संवाद साधला, भारत-मलेशिया संबंध, आयएनए अधिकारी, नेताजी कल्याण फाउंडेशन, थिरुवल्लुवर केंद्र, ओसीआय कार्ड यांचा उल्लेख.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मलेशियातील अनिवासी भारतीय निवडक सदस्यांसोबत संवाद साधला. या शिष्टमंडळात  मलेशियाचे मंत्री, खासदार आणि आझाद हिंद फौजेतील (इंडियन नॅशनल आर्मी आयएनए) निवृत्त अधिकाऱ्यांचा समावेश होता. डिजिटल मंत्री गोविंद सिंग देव, मानव संसाधन मंत्री रामानन रामकृष्णन, पंतप्रधानांच्या विभागातील उप मंत्री एम. कुलसेगरन आणि राष्ट्रीय एकता उप मंत्री आर. युनेस्वरन हे मंत्री या संवादात सहभागी झाले होते.
News18
News18
advertisement

मलेशियाची प्रगती आणि विकास यामधे तसेच भारत आणि  मलेशिया यांचे  संबंध दृढ करण्यामधे तिथल्या भारतीयांचे योगदान लक्षणीय असल्याचे पंतप्रधान म्हणाले. भारत – मलेशिया संबंध दृढ करण्यासाठी सुरू केलेल्या उपाययोजना तसेच दोन्ही देशांमधील सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीसाठी पंतप्रधानांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल पीआयओ नेत्यांनीही पंतप्रधानांचे आभार मानले. भारतातील प्रगतीसाठी पंतप्रधान करत असलेल्या कामाचीही त्यांनी प्रशंसा केली.

advertisement

मलेशियातील भारतीय समुदायाच्या कल्याणासाठी पंतप्रधानांनी सुरू केलेल्या उपक्रमांबद्दल पीआयओ नेत्यांनी त्यांचे आभार मानले. या उपक्रमांमध्ये 1) मलेशियात पहिले भारतीय उच्चायुक्तालय सुरू करण्याचा भारताचा निर्णय 2) मलेशिया विद्यापीठात थिरुवल्लुवर केंद्र सुरू करण्याची घोषणा 3) थिरुवल्लुवर शिष्यवृत्ती 4) मलेशियात राहणाऱ्या मूळ भारतीय वंशाच्या नागरिकांच्या सहाव्या पिढीपर्यंत ओसीआय कार्ड 5) मलेशियन भारतीय विद्यार्थ्यांच्या लाभासाठी 30 लाख मलेशिया रिंगीट भरपाईसह भारतीय शिष्यवृत्ती विश्वस्त निधी यांचा समावेश आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आल्याचे भाव तेजीत, केळी आणि डाळिंबाला आज काय मिळाला दर? इथं चेक करा
सर्व पहा

पंतप्रधान आझाद हिंद फौजेतील (इंडियन नॅशनल आर्मी – आयएनए) बालक सेनेत सहभागी असलेले जेयराज राजा राव आणि नेताजी कल्याण फाउंडेशनचे अध्यक्ष राथाकृष्णन यांनाही पंतप्रधान भेटले. आयएनए आणि आयएनएचे निवृत्त अधिकारी यांच्या अविस्मरणीय शौर्याबद्दल  आणि त्यागाविषयी पंतप्रधानांनी गौरवोद्गार काढले. नेताजींच्या स्वप्नातील समर्थ आणि  आधुनिक भारताच्या निर्माणासाठी भारत सरकार वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

advertisement

मराठी बातम्या/देश/
पंतप्रधानांनी मलेशियातील निवडक अनिवासी भारतीयांबरोबर साधला संवाद
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल