कुटुंबियांनी त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी जे सांगितले ते ऐकून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. चिमुकल्याने दगड गिळला होता, तो त्याच्या घशात अडकला होता. त्यामुळे त्याला श्वास घेता येत नव्हता आणि त्यामुळे गुदमरुन त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे महरूफ आणि रुमाना यांच्या सुखी संसारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अंगणात खेळताना घडला प्रकार मृत बालकाची ओळख असलम नूह अशी पटली आहे
advertisement
रविवारी संध्याकाळी असलम आपल्या घराच्या अंगणात नेहमीप्रमाणे खेळत होता. खेळता खेळता जमिनीवर पडलेला एक लहानसा दगड त्याने उचलला आणि तोंडात टाकला. तो दगड गिळल्यानंतर काही वेळातच त्याला श्वास घेण्यास प्रचंड त्रास होऊ लागला. आपल्या पोटच्या गोळ्याला तडफताना पाहून पालकांनी तातडीने त्याला जवळच्या खाजगी रुग्णालयात नेले.
डॉक्टरांचे प्रयत्न ठरले अपयशी
केरळच्या चंगारमकुलममधील प्राथमिक उपचारानंतर असलमची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला कुट्टक्कल येथील मोठ्या रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांनी त्या चिमुकल्याचा जीव वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र घशात अडकलेल्या दगडामुळे श्वासोच्छवास पूर्णपणे खंडित झाला होता. अखेर रविवारी रात्री या चिमुकल्याने जगाचा निरोप घेतला. अवघ्या एक वर्षाच्या लेकराचा असा अंत झाल्याने डॉक्टरांनीही हळहळ व्यक्त केली.
पोलिसांकडून अपघाती मृत्यूची नोंद या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी प्रकरणाचा तपास केला. चंगारमकुलम पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा एक दुर्दैवी अपघात आहे. लहान मूल खेळत असताना ही घटना घडल्याने यात कोणताही संशयास्पद प्रकार आढळलेला नाही. त्यामुळे पोलिसांनी कोणतीही कायदेशीर तक्रार नोंदवलेली नाही.
