ईशान्य भारतातील अशा प्रकारची ही पहिलीच धावपट्टी (ELF) असून, या ऐतिहासिक क्षणाने संपूर्ण जगाचे लक्ष भारताच्या वाढत्या सामर्थ्याकडे वेधलं.
नेहमी गाड्या धावणाऱ्या या हायवेवर आज जेव्हा पंतप्रधानांच्या विमानाने लँडिंग केलं हा थरारक अनुभव पाहण्यासाठी काही स्थानिक तिथे जमले होते. ही फक्त एक टेस्ट नव्हती, तर आपत्कालीन स्थितीत भारतीय हवाई दल किती सज्ज आहे, याची ही मोठी प्रचिती होती.
advertisement
या ठिकाणी पंतप्रधान मोदींनी फायटर जेट्स, अजस्त्र ट्रान्सपोर्ट विमाने आणि हेलिकॉप्टर्सचे थरारक हवाई प्रदर्शन पाहिले. धावपट्टीची ही सुविधा ईशान्य भारतातील सुरक्षा व्यवस्थेत मोठी क्रांती घडवून आणेल.
पीएम मोदींसाठी हायवे बनला रनवे!
राजकीय आणि धोरणात्मक दृष्टिकोनातून पाहिले तर ही घडामोड अत्यंत महत्त्वाची आहे. अरुणाचल प्रदेशच्या सीमेलगत असलेल्या या भागात अशा प्रकारचं लँडिंग करण्याची सुविधा उभी करून भारताने एक प्रकारे मेसेज दिला आहे.
युद्धकाळात जर हवाई दलाचे मुख्य तळ शत्रूच्या निशाण्यावर असतील, तर भारतीय फायटर जेट्स आता थेट हायवेवरूनही उड्डाण करू शकतील आणि लँडिंगही करू शकतील. यामुळे सीमेवर रसद आणि कुमक पोहोचवणे अधिक वेगानं शक्य होईल.
हा केवळ लष्करी प्रकल्प नसून, याचा थेट फायदा इथल्या कनेक्टिव्हिटीला होणार आहे. नैसर्गिक आपत्ती किंवा आपत्कालीन आरोग्य सेवांच्या वेळी या धावपट्टीचा उपयोग नागरी कामांसाठीही केला जाऊ शकतो. आसामच्या भूमीवर झालेलं हे शक्तिप्रदर्शन भारताच्या 'ॲक्ट ईस्ट' धोरणाला नवी ताकद देणारं ठरणार आहे.
