advertisement

Valentines Day 2026: अभ्यासही केला अन् प्रेमही, शेवटी IAS अन् मनासारखी बायको; जी श्रीकांत यांची Love Story Video

Last Updated:

Valentines Day 2026: व्हॅलेंटाईन्स डेला काही लव्हस्टोरी चर्चेत असतात. छ. संभाजीनगरचे मनपा आयुक्त जी. श्रीकांत आणि पत्नी सोनम यांची प्रेमकहाणी जाणून घेऊ.‎

+
Valentines

Valentines Day 2026: अभ्यासही केला अन् प्रेमही, शेवटी IAS अन् मनासारखी बायको; जी श्रीकांत यांची खास लव्ह स्टोरी, Video

छत्रपती संभाजीनगर: 14 फेब्रुवारी हा दिवस प्रेमाचा दिवस म्हणजेच ‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणून सर्वत्र साजरा करतात. ‘व्हॅलेंटाईन डे’ला अगदी हीर-रांझापासून अनेकांची प्रेम कहाणी सांगितली जाते. तर सध्याच्या काळातील काही सेलिब्रिटी कपलच्या लव्हस्टोरी देखील चर्चेत असतात. अशीच एक हटके लव्हस्टोरी आपण लोकल18 च्या माध्यमातून पाहणार आहोत. ती म्हणजे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त जी. श्रीकांत आणि त्यांच्या पत्नी सोनम यांची. ‎ ‎ ‎
मनपा आयुक्त जी. श्रीकांत आणि त्यांच्या पत्नी सोनम यांची पहिली भेट 2006 मध्ये झाली. “जशी प्रत्येकाच्या प्रेमाची सुरुवात होते, अगदी तशीच आधी मैत्री, नंतर प्रेम अशीच आमची देखील सुरुवात होती. प्रेमाचा प्रस्ताव पहिल्यांदा कुणाकडून आला असं काही नाही. आमच्यात मैत्री होती आणि त्याचं रूपांतर प्रेमात झालं. आमच्या लग्नाला घरच्यांचा काही विरोध नव्हता. आम्ही दोघेही सेटल झालो होतो. त्यानंतर आम्ही निर्णय घेतला,” असं सोनम सांगतात.
advertisement
सुरुवातीला सर एका ठिकाणी नोकरी करत होते. त्यानंतर त्यांनी अभ्यास करून आयएएस झाले. सगळं सेटल असल्यामुळे कुटुंबीयांनी देखील लग्नाला विरोध केला नाही, असंही जी. श्रीकांत यांच्या पत्नी सोनम यांनी सांगितलं.
“ आम्ही गेली 19 वर्षे एकमेकांच्या सोबत आहोत. या काळात आयुष्यात अनेक चढउतार आलेले आहेत. पण त्या सर्व चढउतारामध्ये मला सोनमने खूप साथ दिली. आम्ही दोघं आमचं सगळं अभ्यास, नोकरी करून सगळ्या गोष्टी केल्या. यात तिनं मला खूप साथ दिली, असं जी. श्रीकांत सांगतात.
advertisement
जी. श्रीकांत यांचा तरुणाईला सल्ला
“तारुण्यात काही गोष्टी तरुणाई करत असते. परंतु, तरुण पिढीला एवढंच सांगणं आहे की, तुम्ही जे काही करणार त्यासाठी आधी स्वत: तयार व्हा. अभ्यास करून स्वत:चं करिअर सेट करा. त्यानंतर सर्व गोष्टी केल्यास तुम्हाला भविष्यात अडचणींचा सामना करावा लागणार नाही,” असा सल्ला व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त जी. श्रीकांत देतात.
view comments
मराठी बातम्या/लव स्टोरी/
Valentines Day 2026: अभ्यासही केला अन् प्रेमही, शेवटी IAS अन् मनासारखी बायको; जी श्रीकांत यांची Love Story Video
Next Article
advertisement
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात; लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली, सरकारचा मोठा निर्णय
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात
  • 8व्या वेतन आयोगाबाबत सरकारचा मोठा निर्णय

  • लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली!

  • पगार आणि पेन्शन किती वाढणार

View All
advertisement