वायएसआरसीपी सरकारच्या कार्यकाळात कर्नाटक दूध महासंघाच्या 'नंदिनी' ब्रँडच्या तुपाच्या जागी खासगी कंत्राटदाराला तिरुपती लाडूसाठी तूप पुरवण्याचं कंत्राट दिलं होतं. पुरवठादार बदलल्यानंतर लाडूंच्या गुणवत्तेबाबत अनेक तक्रारी आल्या होत्या.
सीएनएन न्यूज 18 ने तिरुपती मंदिराला तूप पुरवणाऱ्या कंपनीशी संपर्क साधला. या कंपनीने सर्व आरोप फेटाळले आहेत.
कंपनीने सांगितलं, 'सर्व माहिती चुकीची आहे. या सर्व अफवा आहेत. कोणीही कोणावरही आरोप करू शकतो, याचा पुरावा काय आहे? कोणी काहीही म्हणेल याचा अर्थ असा नाही की ते सत्य आहे. कोणीही कोणावरही आरोप करू शकतो, अहवाल कोणीही तयार करू शकतो'
advertisement
मुंबईतील 3 सर्वात श्रीमंत ठिकणं, पैसेवाल्यांची आहे पहिली पसंत
'आम्ही फक्त दूध वापरत आहोत. ते 100 टक्के गायीचं दूध आहे. आमच्याकडे सर्व आवश्यक लॅब रिपोर्ट्स आहेत', असं कंपनी म्हणाली.
रिपोर्टमध्ये काय म्हटलं आहे?
सेंटर ऑफ ॲनालिसिस अँड लर्निंग इन लाइव्हस्टॉक अँड फूड, किंवा CALF, गुजरातच्या नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाच्या प्रयोगशाळेच्या अहवालात YSRCP सत्तेत असताना प्रसिद्ध तिरुपती लाडू तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तुपात प्राण्यांच्या चरबीची उपस्थिती उघड झाली. अहवालात असे सूचित केले आहे की तुपात फिश ऑइल, बीफ टॉलो आणि लार्डचे अंश आहेत; तसेच त्यात अर्ध-घन पांढरे चरबी उत्पादन आहे जे डुकराच्या फॅटी टिश्यूचे प्रस्तुतीकरण करून प्राप्त होते, त्याचा वापर देखील केला गेला आहे.
प्राणी-पक्षी, फळ-फूल सगळ्यांनाच माहिती; आता भारताची राष्ट्रीय भाजी कोणती ते सांगा
वायएसआरसीपीने फेटाळला दावा
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी बुधवारी आरोप केला की, मागील वायएसआरसीपी सरकारच्या काळात प्रसिद्ध तिरुपती लाडू बनवण्यासाठी निकृष्ट घटक आणि प्राण्यांची चरबी वापरली गेली. मात्र वायएसआरसीपीने हा दावा फेटाळून लावला आहे.