TRENDING:

पंतप्रधानांच्या हस्ते 16 फेब्रुवारी रोजी होणार भारत एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) इम्पॅक्ट एक्स्पो 2026 चे उद्घाटन

Last Updated:

भारत मंडपम् येथे भारत एआय इम्पॅक्ट प्रदर्शन 2026 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 16 ते 20 फेब्रुवारीला होणार असून 13 देशांचे पॅव्हिलिअन आणि 2.5 लाख अभ्यागतांचा सहभाग अपेक्षित.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीतील भारत मंडपम् इथे 16 फेब्रुवारी 2026 रोजी संध्याकाळी पाच वाजता भारत एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) इम्पॅक्ट प्रदर्शन 2026 चे उद्धाटन होणार आहे. भारत एआय इम्पॅक्ट परिषदेदरम्यान, भारत मंडपम् इथं, भारत एआय इम्पॅक्ट प्रदर्शन 2026 16 ते 20 फेब्रुवारी 2026 पर्यंत आयोजित केले जाणार आहे. एआयमधील राष्ट्रीय कार्याचे प्रात्यक्षिक यानिमित्ताने दिसणार असून, धोरण आणि प्रत्यक्ष सराव, नवोन्मेष आणि व्याप्ती  आणि सामान्य  नागरिक आणि तंत्रज्ञान यांचा मेळ पहायला मिळेल.
News18
News18
advertisement

70,000 चौरस मीटरपेक्षा अधिक क्षेत्रफळावर 10 कार्यक्षेत्रांमध्ये विभागलेल्या या प्रदर्शनात, जागतिक तंत्रज्ञान कंपन्या, स्टार्टअप्स, शैक्षणिक आणि संशोधन संस्था, केंद्रीय मंत्रालये, राज्य सरकारे आणि आंतरराष्ट्रीय भागीदार एकत्र येणार आहेत. प्रदर्शनात 13 देशांचे पॅव्हिलिअन  असतील जे एआय परिसंस्थेतील आंतरराष्ट्रीय सहकार्याचे प्रदर्शन करतील. या मध्ये ऑस्ट्रेलिया, जपान, रशिया, सोव्हिएत संघराज्य, फ्रान्स, जर्मनी, इटली, नेदरलँडस्, स्वित्झर्लंड, सर्बिया, एस्टोनिया, ताजिकिस्तान आणि अफ्रिका या देशांच्या पॅव्हिलिअनचा समावेश असेल.

advertisement

या प्रदर्शनामध्ये 300हून अधिक निवडक प्रदर्शन पॅव्हिलिअन आणि प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांचे आयोजन केले जाणार असून, ते लोक, ग्रह आणि प्रगती  या विषयसूत्र चक्रांवर आधारित असतील. त्या शिवाय, प्रदर्शनामध्ये 600हून अधिक उच्चक्षमता स्टार्टअप्स, जे जागतिक पातळीवर आणि लोकसांख्यिक प्रमाणात उपाय तयार करतील. सध्या जगात आधीच लागू असलेल्या चालू उपायांचे प्रात्यक्षिक हे स्टार्टअप्स सादर करतील. भारत एआय इम्पॅक्ट एक्स्पो 2026 मध्ये 2.5 लाखांहून अभ्यागतांचा सहभाग अपेक्षित असून त्यामध्ये आंतरराष्ट्रीय प्रतिनिधीमंडळांचाही समावेश असेल. या कार्यक्रमाचे उद्दीष्ट जागतिक एआय परिसंस्थेमध्ये नवीन भागीदारी वृद्धिंगत करणे आणि व्यवसाय संधी निर्माण करणे आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आंब्याची होतीये फळगळ, टाळण्यासाठी करा हे 5 प्रभावी उपाय, होईल फायदा
सर्व पहा

3250 हून अधिक दूरदर्शी वक्तांच्या 500 सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे. विविध क्षेत्रांमध्ये एआयच्या परिवर्तनात्मक प्रभाव ओळखणे आणि प्रत्येक जागतिक नागरिकाला एआयचा फायदा व्हावा यासाठी भविष्यवेधी कृतींवर विचारविनिमय करण्यावर ही सत्रे लक्ष केंद्रित करतील.

मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
पंतप्रधानांच्या हस्ते 16 फेब्रुवारी रोजी होणार भारत एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) इम्पॅक्ट एक्स्पो 2026 चे उद्घाटन
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल